16 MLA Disqualification : आमदार अपात्रता सुनावणीदरम्यान आज पुन्हा एकदा खडाजंगी

दोन्ही गटांच्या वकिलांमधील युक्तिवाद शिगेला...


मुंबई : ठाकरे गट (Thackeray Group) विरुद्ध शिवसेनेच्या (Shivsena) आमदार अपात्रतेप्रकरणी (MLA Disqualification) आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोर (Rahul Narvekar) सुनावणी पार पडली. यादरम्यान, ठाकरे व शिंदे गटाच्या वकिलांच्या युक्तीवादादरम्यान पुन्हा एकदा खडाजंगी पाहायला मिळाली. दोन्ही वकिलांनी केलेल्या वैयक्तिक टीका टिप्पणीवरून अध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली. व्यक्तिगत टीकाटिप्पणी करू नका, तुमचा मुद्दा कायदेशीररित्या मांडा, असा सल्ला देत अध्यक्षांनी आपली नाराजी दर्शवली.


शिवसेना शिंदे गटाकडून वकील महेश जेठमलानी आणि ठाकरे गटाकडून वकील देवदत्त कामत उपस्थित होते. कागदपत्र सादर करण्यासाठी शिवसेना शिंदे गटाला २४ तारखेपर्यंत वेळ देण्यात आला आहे. मात्र, त्यांनी हा वेळ वाढवून मागितला. तर ठाकरे गटाने आज कागदपत्रे सादर केली.


ठाकरे गटाच्या वकिलांनी सुनील प्रभूंच्या साक्षीचं वाचन केलं. प्रभूंनी दिलेल्या साक्षीनुसार संबंधित कागदपत्रे ठाकरे गटाने सादर केली. ही साक्ष विधीमंडळाकडून टाईप केली जात आहे. त्यात कुठलीही चूक होऊ नये, म्हणून विधीमंडळाकडून सुरु असलेली टायपिंग दिसण्यासाठी एक मोठी स्क्रीन लावण्यात आली आहे.


सर्व युक्तिवाद व आक्षेपाचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करावे, अशी मागणी ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी केली. विधानसभा अध्यक्षांनी ही मागणी फेटाळली. सर्व युक्तिवाद व आक्षेप हे रेकॉर्डवर घेतले जात असल्याचे अध्यक्ष नार्वेकरांनी सांगितले. या सुनावणीत आता पुढे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

Comments
Add Comment

रंगांमधून उमलणारी स्वप्नं : जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये

दिव्यांग कलाकारांसाठी ‘विविधतेचा उत्सव’ मुंबई : कॅनव्हासवर रंग उमटत होते, पण ते केवळ चित्र

सागरी सुरक्षेसाठी आणखी १० ड्रोन खरेदी करा!

मंत्री नितेश राणे यांचे निर्देश; संवेदनशील लँडिंग पॉईंट्सवर सशस्त्र सुरक्षा रक्षक आणि 'सागर मित्र' नेमणार मुंबई

Metro-9 from Dahisar to Mira Bhayandar दहिसर ते मीरा भाईंदर 'मेट्रो-९'ला मुख्यमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा

ठाणे जिल्ह्यातील पहिली मेट्रो सेवा सुरू; वाहतूक कोंडीतून होणार सुटका मुंबई :

Mumbai Metro 9 Inauguration : अखेर दहिसर-काशिगाव मेट्रो लाईन ९ चे होणार उद्घाटन; जाणून घ्या स्थानके, तिकीटाची किंमत

मुंबई : तारीख पे तारीख म्हणत आज अखेर मुंबई मेट्रो ९ ( दहिसर ते काशीगाव ) या मार्गिकेचे उदघाटन संपन्न होणार आहे.

रस्ते विकासाच्या कामांबाबत मनसेच्या किल्लेदारांचा स्थायी समिती अध्यक्षांना सवाल

अर्थसंकल्पावरील भाषणात घेतला समाचार मुंबई : मुंबईतील अनेक रस्त्यांच्या कामांच्या विकासाची कामे

प्रत्येक उद्यानांमध्ये बोअरवेल खोदण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

मुंबई : मुंबईमधील महानगरपालिकेच्या सर्व विद्यमान उद्यानांमध्ये व उद्यानांचा विकास करुन नव्याने तयार करण्यात