मुंबई: ऑस्ट्रेलियाने भारताला हरवत सहाव्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले. या विजयानंतर ऑस्ट्रेलियाच्या संघावर जोरदार पैशांचा पाऊस पडत आहे. ऑस्ट्रेलियाने वर्ल्डकप २०२३च्या फआयनलमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाला हरवत खिताब आपल्या नावे केला. हा ऑस्ट्रेलियाचा सहावा वर्ल्डकप आहे.
या विजयानंतर ऑस्ट्रेलियाच्या संघावर जोरदार पैशांचा पाऊस पडला. केवळ ऑस्ट्रेलियाच नव्हे तर टीम इंडियाच्या खेळाडूंनाही कोट्यावधी रूपयांचे बक्षीस मिळाले. आयसीसीकडून वर्ल्डकप २०२३साठी एकूण १० मिलियन अमेरिकन डॉलर(८३ कोटी भारतीय रूपये) ची घोषणा करण्यात आली होती. जिंकणाऱ्या संघाला म्हणजेच ऑस्ट्रेलियाला ४ मिलियन अमेरिकन डॉलरची रक्कम देण्यात आली.
तर हरणाऱ्या संघाला टीम इंडियालाही बक्षीस मिळाले आहे. आयसीसीकडून रनरअप टीमला २ मिलियन अमेरिकन डॉलरचे बक्षीस देण्यात आले.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगलेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने बाजी मारली. भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या भेदक गोलंदाजीमुळे २४० धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने दिलेल्या २४१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ४३ षटकांत पूर्ण केले होते.