चंद्रपूर : ‘कुंपणच शेत खातं’ याची प्रचिती चंद्रपुरात आली. चोरट्यांपासून संरक्षण करणाऱ्या पोलिसानेच घरफोडी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेला नरेश डाहुले याला अटक केल्याने चंद्रपूर पोलिसात मोठी खळबळ उडाली आहे
चंद्रपूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेला नरेश डाहुलेकडून ६,९०० रुपयांची रोकड आणि चोरी करण्यासाठी वापरण्यात आलेला रॉड जप्त केला आहे. या प्रकरणात आरोपीने दोन ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली असून चंद्रपूर पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
चंद्रपूर शहरातील सहकार नगर भागात काही दिवसांपूर्वी ४ हजारांची तर सप्टेंबर महिन्यात उपगणलावार ले-आऊट मध्ये ८० हजारांची घरफोडी झाली होती. या प्रकरणी रामनगर पोलिसांच्या तपासात या दोन्ही घरफोडी नरेश डाहुले यानेच केल्याचे निष्पन्न झाले.
पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑनलाइन शेअर ट्रेडिंगच्या व्यसनामुळे आरोपी पोलीस कर्मचाऱ्यावर २२ लाखांचे कर्ज झाले होते. त्यातून त्याने हे कृत्य केल्याची माहिती प्राथमिक तपासात उघड झाली आहे.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात टक्कर…
मुंबई : केंद्रीय कामगार संहितेच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र वेतन संहिता नियम, २०२५ आणि…
Rafrigerator Care: सध्या उन्हाळा प्रचंड वाढला असून,या काळात एसी , कूलर पाठोपाठ थंडगार पाणी तसेच…
मुंबई: उन्हाळ्यात आपले शरीर थंड ठेवणे अतिशय गरजेचे असते.कारण या मोसमात अॅसिडिटी, डायरिया तसेच पचनासंबंधित…
कोल्हापूर : राज्यात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. एसटी बस, ट्रक यांचे अपघात सर्रास पाहायला…
मेरठ: शुभांगी अत्रे यांच्या माजी पतीच्या निधनानंतर, टीव्ही इंडस्ट्रीमधून आणखी एक वाईट बातमी समोर येत…