Saturday, May 24, 2025

विदेशक्रीडाब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

India Vs Australia WC Finale : ज्यांची लायकी नाही त्यांच्याकडे ट्रॉफी गेली!

India Vs Australia WC Finale : ज्यांची लायकी नाही त्यांच्याकडे ट्रॉफी गेली!

मिचेल मार्शच्या 'त्या' फोटोवर भारतीय क्रिकेटप्रेमींचा संताप...


मुंबई : क्रिकेट विश्वचषकातील (Cricket World Cup 2023) भारताच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (India Vs Australia) पराभवानंतर करोडो भारतीयांचे स्वप्न तुटले. ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा वर्ल्डकप आपल्या नावावर केला तर भारताची तिसर्‍यांदा वर्ल्डकपवर नाव कोरायची संधी हुकली. यानंतर ऑस्ट्रेलियाच्या संघाचा जल्लोष सुरु आहे. मात्र, त्या जल्लोषादरम्यान पॅट कमिन्स (Pat Cummins) या ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराने आपल्या इन्स्टा अकाऊंटला शेअर केलेल्या मिचेल मार्शच्या (Mitchell Marsh) एका फोटोमुळे भारतीय क्रिकेटप्रेमी प्रचंड संतापले आहेत.


व्हायरल झालेल्या फोटोमध्ये मिचेलने वर्ल्डकप ट्रॉफी आपल्या पायाखाली ठेवली आहे आणि तो सोफ्यावर दिमाखात हातात बिअरची बाटली घेऊन बसला आहे. इतक्या मेहनतीने मिळवलेल्या ट्रॉफीला अशा प्रकारे मानसन्मान न देणं भारतीयांना मात्र रुचलेलं नाही. ट्रॉफीचा आदर करण्याचा सल्ला त्याला भारतीयांनी दिला आहे.







काही क्रिकेटप्रेमींनी भारतीय खेळाडूंचे हातात वर्ल्डकप घेतलेले फोटो शेअर केले आहेत. या ट्रॉफीची किंमत काय आहे हे भारतीय संघाला विचारा, असं त्यांनी म्हटलं आहे. 'ज्यांची लायकी नाही त्यांच्याकडे ट्रॉफी गेली!' अशा कमेंट्स काहीजणांनी केल्या आहेत. तसेच ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डालाही त्यांच्या खेळाडूंना याबाबत शिकवण्याचा सल्ला दिला आहे.




Comments
Add Comment