मुंबई: विश्वचषक २०२३(world cup 2023) जरी संपला असला तरी क्रिकेटचा फिव्हर संपलेला नाही. २३ नोव्हेंबर गुरूवारपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. मालिकेतील शेवटचा सामना ३ डिसेंबर रविवारी खेळवला जाईल. मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. तर भारताच्या संघाची घोषणा होणे बाकी आहे. ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व मॅथ्यू वेड करत आहे.
बीसीसीआयकडून लववकरच भारतीय संघाची घोषणा केली जाऊ शकते. रिपोर्ट्सनुसार भारताचे नेतृत्व ऋतुराज गायकवाड अथवा सूर्यकुमार यादव सांभाळू शकतात. नियमित कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीसह अनेक वरिष्ठ खेळाडूंना आराम दिला जाऊ शकतो. अशातच ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी युवा खेळाडूंना संधी दिली जाऊ शकते.
भारतीय स्क्वॉडमध्ये यशस्वी जयसवाल, रिंकू सिंह, तिलक वर्मा आणि सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करणाऱ्या रियाग पराग सारख्या फलंदाजांना संधी मिळू शकते. तर संजू सॅमसन विकेटकीपर म्हणून पुनरागमन करू शकतो आणि जितेश शर्मा बॅकअप विकेटकीपर होऊ शकतो. तर गोलंदाजीत मुकेश कुमार, अर्शदीप सिंह आणि रवी बिश्नोई सारखे गोलंदाज सामील होऊ शकतात.
असे आहे वेळापत्रक
पहिला सामना २३ नोव्हेंबर, गुरूवार, राजशेखर रेड्डी एसीए-वीडीसीए क्रिकेट स्टेडियम, विशाखापट्टणम
दुसरा सामना – २६ नोव्हेंबर, रविवार, ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियम, तिरूअनंतपुरम
तिसरा सामना – २८ नोव्हेंबर, मंगळवार, बारसापारा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी
चौथा सामना – १ डिसेंबर, विदर्भ क्रिकेट असोसिएशन ग्राऊंड, नागपूर
पाचवा सामना – ३ डिसेंबर राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद
टी-२० मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ
मॅथ्यू वेड(कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, टीम डेविड, स्टीव्ह स्मिथ, ट्रेविस हेड, डेविड वॉर्नर, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, सीन एबॉट, जोश इंग्लिश, तनवीर सांघा, नाथन एलिस, जेसन बेहरेनडॉर्फ, स्पेन्सर जॉनसन, एडम झाम्पा
भारताचा संभाव्य संघ
सूर्यकुमार यादव, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन(विकेटकीपर), रवी बिश्नोई, यशस्वी जैसवल, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, प्रसिद्ध कृष्णा, तिलक वर्मा, जितेश वर्मा(विकेटकीपर), अर्शदीप सिंह, रिंकू सिंह, रियान पराग, रवी बिश्नोईस,युझवेंद्र चहल, मुकेश कुमार