Tuesday, April 22, 2025
Homeक्रीडाIND vs AUS T20 : ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, सूर्याकडे नेतृत्व

IND vs AUS T20 : ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, सूर्याकडे नेतृत्व

मुंबई: विश्वचषक २०२३(world cup 2023) सरल्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेतील पहिला सामना २३ नोव्हेंबरला विशाखापट्टणम येथे खेळवला जाणार आहे.

दरम्यान, या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेत सूर्यकुमार यादव टीम इंडियाचा कर्णधार असणार आहे. या मालिकेसाठी रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारख्या खेळाडूंना आराम देण्यात आला आहे.

या मालिकेसाठी विशाखापट्ट्णम वगळता तिरूअनंतपुरम, गुवाहाटी, नागपूर आणि हैदराबादमध्ये खेळवला जाणार आहे. तर भारत-ऑस्ट्रेलिया टी-२० मालिकेतील सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सात वाजता सुरू होणार आहेत.

पहिला सामना २३ नोव्हेंबर, गुरूवार, राजशेखर रेड्डी एसीए-वीडीसीए क्रिकेट स्टेडियम, विशाखापट्टणम
दुसरा सामना – २६ नोव्हेंबर, रविवार, ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियम, तिरूअनंतपुरम
तिसरा सामना – २८ नोव्हेंबर, मंगळवार, बारसापारा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी
चौथा सामना – १ डिसेंबर, विदर्भ क्रिकेट असोसिएशन ग्राऊंड, नागपूर
पाचवा सामना – ३ डिसेंबर राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद

टी-२० मालिकेसाठी भारताचा संघ

सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड़ (उपकर्णधार), ईशान किशन, यशस्वी जयसवाल, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), वाशिंगटन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, प्रसिद्ध कृष्णा, अवेश खान और मुकेश कुमार

टी-२० मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ

मॅथ्यू वेड(कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, टीम डेविड, स्टीव्ह स्मिथ, ट्रेविस हेड, डेविड वॉर्नर, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, सीन एबॉट, जोश इंग्लिश, तनवीर सांघा, नाथन एलिस, जेसन बेहरेनडॉर्फ, स्पेन्सर जॉनसन, एडम झाम्पा

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -