नवी दिल्ली: निवडणूक आयोगाने सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, पाच निवडणूक राज्यांत १७६० कोटी रूपयांपेक्षा अधिक रूपयांच्या वस्तू, मादक पदार्त, कॅश, दारू तसेच महागडे सामान ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच आयोगाने दावा केला आहे की या सर्व गोष्टी मतदारांना प्रभावित करण्यासाठी देण्यात आल्या होत्या.
आयोगाच्या माहितीनुसार ऑक्टोबरमध्ये निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केल्यानंतर आतापर्यंत जप्त केलेल्या राज्यांमधील वस्तू या २०१८मध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान जप्त केलेल्या गोष्टींच्या सातपट अधिक रूपयांच्या आहेत.
मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि मिझोरम राज्यांत विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले आहे तर राजस्थानात २५ नोव्हेंबर आणि तेलंगणामध्ये ३० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. आयोगाच्या विधानानुसार याआधी सहा राज्यांत गुजरात, हिमाचल प्रदेश, नागालँड, मेघालय, त्रिपुरा आणि कर्नाटकात विधानसभा निवडणुकीदरम्यान १४०० रूपयांहून अधिक किंमतीच्या गोष्टी जप्त करण्यात आल्या आहेत. गेल्या वेळच्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत ही रक्कम ११ पट अधिक होती.
निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगिले की पाच राज्यांच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सर्व उमेदवारांना तसेच पक्षांना सांगितले होते की प्रलोभनमुक्त निवडणुकीवर जोर दिला होता.