जालना : जालना येथे अंतरवली सराटी येथे उपोषणासाठी बसलेल्या माराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्याचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले नसल्याची माहिती पुढे आली आहे.
मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसलेल्या ठिकाणी पोलिस कर्मचारी आणि मराठा आंदोलनकर्त्यांमध्ये संघर्ष पाहायला मिळाला होता. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज केला होता. मात्र, लाठीचार्जचा आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचा आरोप काहींकडून करण्यात येत होता.परंतु. माहिती अधिकार कार्यकर्ते आसाराम डोंगरे यांनी आरटीआय अर्ज केला होता. त्याला उत्तर देताना, आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून आदेश मिळाले नव्हते, अशी माहिती जालन्याचे पोलीस उपअधिक्षक आर सी शेख यांनी दिली आहे.
दरम्यान, मराठा आंदोलकांनी दगडफेक केल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती. त्यानंतर टीका होऊ लागल्याने त्यांनी याप्रकरणी माफी मागितली होती. लाठीचार्ज व्हायला नको होता, असे ते म्हणाले होते. लाठीचार्जचा निर्णय पोलिसांनी त्यावेळची परिस्थिती पाहून घेतला होता, असे फडणवीस म्हणाले होते.