अहमदाबाद : भारतीय क्रिकेट संघाने लाखो क्रिकेट चाहत्यांची निराशा केली हे जरी खरे असले तरी चाहत्यांनी आपल्या लाडक्या खेळाडुंवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
ऑस्ट्रेलियाने विश्वकपावर आपले नाव कोरले आणि भारतीय खेळाडुंच्या डोळ्यात अश्रु तरळले. यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट ड्रेसिंग रुममध्ये जाऊन भारतीय संघाला आधार दिला. यावेळी त्यांनी ढसाढसा रडणा-या वेगवान भारतीय गोलंदाज मोहम्मद शमी याची गळाभेट घेतली. मोदींनी शमीचे सात्वंन केले. शमीने त्याच्या इंस्टावरुन हा व्हिडिओ शेयर केला आहे.
View this post on Instagram
तो व्हिडिओ आता सोशल मीडीयावर व्हायरल झाला असून त्याची जोरदार चर्चा होत आहे.
अहमदाबाद येथे झालेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा सहा गडी राखून पराभव केला. त्यानंतर संपूर्ण देशात चाहत्यांमधून हळहळ व्यक्त करण्यात आली.