Friday, July 19, 2024
Homeताज्या घडामोडीUttarkashi tunnel collapse : उत्तरकाशीतील बोगद्यात ते ४१ मजूर नवव्या दिवशीही अडकूनच!...

Uttarkashi tunnel collapse : उत्तरकाशीतील बोगद्यात ते ४१ मजूर नवव्या दिवशीही अडकूनच! बचावकार्यात झाली ‘ही’ मोठी चूक…

उत्तराखंड : उत्तराखंड (Uttarakhand) येथील उत्तरकाशी शहरामध्ये निर्माणाधीन सिल्क्यरा बोगद्याचा काही भाग कोसळल्याने (Uttarkashi Tunnel collapsed) ४० नव्हे तर ४१ मजूर आतमध्ये अडकले. या दुर्घटनेच्या नवव्या दिवशीही मजुरांना बाहेर काढण्यात यश आलेले नाही. त्यांना वाचवण्यासाठी अमेरिकन पद्धतीची आधुनिक मशीन मागवण्यात आली होती. ज्यामुळे मजूर बाहेर निघतीलच असा सर्वांना विश्वास वाटत होता. मात्र, पहिल्या दोन दिवसांत केलेल्या एका चुकीमुळे बचावकार्यातील अडथळे आणि वेळ वाढला आहे. सध्याची परिस्थिती पाहता कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी आणखी पाच दिवस ते एक आठवडा लागू शकतो.

कामगारांना वाचवण्याच्या प्रयत्नात केंद्र सरकारने देखील सखोल लक्ष घातले आहे. बोगदा बांधकाम तज्ज्ञांच्या मते, बोगदा कोसळल्यानंतर दोन दिवसांनी मलबा हटवण्याची चूक झाली. बचाव पथकाने दोन दिवस ढिगारा हटवून सर्वात मोठी चूक केली, कारण कोसळल्यानंतर बोगदा स्थिर ठेवावा लागतो. चुकीमुळे बचावकार्याचा वेळ वाढला आहे.

विनोद कुमार, सेवानिवृत्त कार्यकारी संचालक, प्रकल्प आणि बोगदा अभियंता, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन, नवी मुंबई, यांना या कामाचा ५१ वर्षांचा अनुभव आहे. त्यातूनच त्यांनी ही चूक निदर्शनास आणून दिली. कटरा येथील सलाल प्रकल्पात १९८७ साली बोगदा कोसळला होता तेव्हा हा धडा शिकल्याचे त्यांनी सांगितले. त्यावेळी ढिगारा हटवल्यामुळे बचावकार्याचा कालावधी दोन महिन्यांनी वाढला होता.

त्यानंतर मात्र १९९६ मध्ये जेव्हा गोव्यात असाच बोगदा कोसळला आणि त्यात १४ मजूर अडकले तेव्हा त्यांनी बोगद्यातून ढिगारा काढू दिला नाही. बोगद्यातून मार्ग काढल्यानंतर १३ कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्याचवेळी ढिगारा खाली पडल्याने एका मजुराचा मृत्यू झाला होता. यावेळी सिल्क्यरा बोगद्यातून ढिगारा बाहेर काढण्याची चूक झाली आहे.

दरम्यान, बोगद्याच्या आत आणि वर मार्ग बनवणे ही बचावासाठी सर्वात प्रभावी पद्धत आहे. बोगद्यात सुमारे ६० मीटरचा रस्ता बनवायचा आहे. यामध्ये, एक SJVNL बोगद्याच्या वर, ONGC बोगद्यात तिरपे मार्ग बनवत आहे आणि THDCIL बोगद्याच्या दुसऱ्या टोकापासून मार्ग काढत आहे. सुरुवातीला अडचणी येतील, पण नंतर काम सोपे होईल. यामध्ये सर्वात मोठी बाब म्हणजे २२ मीटरचा रस्ता तयार करण्यात आला असून ३८ मीटरचा रस्ता तयार करायचा आहे. याशिवाय वरील मार्ग बनवण्याची प्रक्रियाही सुरु आहे. सध्या विनोद कुमार सुट्टीनिमित्त अबुधाबीला गेले आहेत, पण जर बोलावले तर मदत करण्याची पूर्ण तयारी त्यांनी दर्शवली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -