Friday, October 4, 2024
Homeक्रीडाWorld Cup finale 2023 : भारताचं ऑस्ट्रेलियाला २४१ धावांचं तुटपुंजं आव्हान

World Cup finale 2023 : भारताचं ऑस्ट्रेलियाला २४१ धावांचं तुटपुंजं आव्हान

आता जबाबदारी भारताच्या गोलंदाजांवर…

अहमदाबाद : क्रिकेट विश्वचषकातील भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND Vs AUS) यांच्यातील अंतिम सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Narendra Modi Stadium) सुरु आहे. यात टॉस जिंकलेल्या ऑस्ट्रेलियाने भारताला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले. हे आव्हान हसतहसत स्विकारलेल्या भारताने नंतर मात्र संथ कामगिरी केली.

आतापर्यंत भारताने विश्वचषकातील दहाही सामने जिंकल्याने भारताकडून जिंकण्याच्या अपेक्षा फार वाढलेल्या आहेत. मात्र, फलंदाजी पाहता आता गोलंदाज तरी आपली जादू दाखवतील का असा प्रश्न निर्माण झाला आहे. भारताने ऑस्ट्रेलियासमोर २४१ धावांचं आव्हान उभं केलं आहे. आतापर्यंतच्या सामन्यांतील हे सर्वात कमी धावसंख्या असलेलं आव्हान आहे.

सुरुवातीलाच शुभमन गिल अवघ्या चार धावांवर बाद झाला. त्यापाठोपाठ रोहित शर्माही ४७ धावांवर तंबूत परतला. त्यानंतर श्रेयसही चार धावांवर बाद झाला. विराट कोहलीने किमान अर्धशतक करत नाव राखले. तो ५४ धावांवर बाद झाला. केएल राहुलनेही ८५ चेंडूंमध्ये कसंबसं अर्धशतक पूर्ण केलं आणि ६६ धावांवर बाद झाला. सेमीफायनल गाजवलेला मोहम्मद शामी केवळ ६ धावांमध्ये आऊट झाला. तर जसप्रीत बुमराह अवघी एक धाव काढून आणि सूर्याकुमार यादव १८ धावांवर बाद झाला. त्यामुळे स्टोडिअममध्ये भारताचा जल्लोष दिसला नाही.

एका विकेटचा धक्का पचवत असतानाच दुसरी विकेट पडली, असं चित्र स्टेडिअमवर निर्माण झालं होतं. त्यामुळे वेळात वेळ काढून सामना पाहायला बसलेल्या चाहत्यांची निराशा झाली आहे. यानंतर भारताच्या गोलंदाजांनी जर आपली जादू दाखवली तरच भारताकडून जिंकण्याच्या अपेक्षा ठेवता येऊ शकतात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -