मुंबई: रविवारी १९ नोव्हेंबरला आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. भारताचा या विश्वचषकात विजय व्हावा आणि तिसऱ्यांदा वर्ल्डकप आपल्याकडे यावा यासाठी संपूर्ण भारतभरातून प्रार्थना केल्या जात आहे. इतकंच नव्हे तर भारताच्या विजयासाठी होम हवन तर अनेक ठिकाणी पुजा अर्चा केल्या जात आहेत. तर मुजफ्फरनगरमध्ये १० मुलांनी निर्जला व्रत ठेवले आहे.
त्यांचे म्हणणे आहे की जोपर्यंत भारताचा विजय होत नाही तोपर्यंत ते काही खाणारही नाहीत आणि पिणारही नाहीत. शिव चौकावर पोहोचून १० तरूणांनी भारताच्या विजयासाठी आधी शिवशंकराची पुजा केली. त्यानंतर संकल्प केला की ते रात्री १२ वाजल्यापासून निर्जला व्रत ठेवतील. या दरम्यान ते काही खाणार-पिणार नाहीत. या तरूणांचे असेही म्हणणे आहे की फायनल सामना जर भारताने हरला तर ते आपल्या जीवनात पुन्हा क्रिकेट सामना पाहणार नाहीत.
फतेहपूरमध्येही भारताच्या विजयाची प्रार्थना करताना सुंदरकांडाचे पठण केल्यानंतर हवन तसेच पुजा केली. फतेहपूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनच्या नेतृत्वात हे सुंदरकांड पठण आणि हवन तसेच पुजा करण्यात आली. युवा खेळाडूंसह महिलांनी हवन पुजा करत टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या.
सेमीफायनलमध्ये भारताने न्यूझीलंडला हरवत अंतिम फेरी गाठली तर दक्षिण आफ्रिकेला हरवत ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरी गाठली. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज अंतिम सामना रंगत आहे.