
अहमदाबाद: विश्वचषक २०२३ स्पर्धा जिंकण्याचे असंख्य भारतीयांचे स्वप्न आज कागांरूंनी मोडले. ऑस्ट्रेलियाने आज विश्वचषकातील फायनल सामन्यात भारताला ६ विकेट राखत जिंकले.ऑस्ट्रेलियाच्या विजयाचे हिरो ठरले ट्रेविस हेड आणि मार्नस लाबुशेन.
या खिताबी सामन्यात २४२ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने ४७ धावांत केवळ तीन विकेट गमावले होते. यानंतर हेडने १२० चेंडूत १३७ धावा तर लाबुशेनने नाबाद ५८ धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा विश्वचषक चॅम्पियन बनला आहे.
फायनल सामन्यात भारताच्या कोणत्याही गोलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. सुरूवातीच्या ओव्हरमध्ये बुमराह आणि शमीने भारताच्या आशा उंचावल्या होत्या. मात्र त्यानंतर दोघांनाही काही करता आले नाही. भारताची सुरूवातच निराशाजनक झाली. भारताने टॉस हरल्याने त्यांना पहिल्यांदा फलंदाजी करावी लागली. भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना केवळ २४० धावा केल्या. सुरूवातीला सलामीवीर रोहित शर्माने फटकेबाजी करताना ४७ धावा केल्या. गिलला केवळ ४ धावा करता आल्या.
भारताच्या फलंदाजांना ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी चांगला स्कोर करण्याची अजिबात संधीच दिली नाही. विराट कोहलीने ५४ धावांची खेळी केली. श्रेयस अय्यर केवळ ४ धावांवर बाद झाला. केएल राहुलने ६६ धावांची खेळी करत थोडीफार धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. रवींद्र जडेजाने ९ धावा केल्या.तर सूर्यकुमार यादवने १८ धावा केल्या.