केवळ ५४ धावांवर विराट बाद
अहमदाबाद : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND Vs AUS) यांच्यात अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Narendra Modi Stadium) अंतिम सामन्यात भारताला अनपेक्षित असा धक्का बसला आहे. विराट कोहली ६३ चेंडूंमध्ये केवळ ५४ धावा काढून बाद झाला आहे. विराट कोहलीने ५६ चेंडूंमध्ये अखेर अर्धशतक कसेबसे आपल्या नावावर केले होते, मात्र आता विराट मैदानाबाहेर गेल्याने चाहत्यांच्या आशेवर पाणी फेरले आहे.
विराटच्या विकेटमुळे भारताचा स्कोअर ४ बाद १४८ धावा राहिला. यानंतर आता केएल राहुल आणि रविंद्र जडेजा फलंदाजी करत आहेत. भारताची फलंदाजी चांगलीच मंदावली आहे, तर ऑस्ट्रेलियाची फिल्डींग फॉर्ममध्ये आहे.