Saturday, October 5, 2024
Homeक्रीडाWorld Cup 2023IND vs AUS Final: क्रिकेटच्या जगातील सर्वात मोठे स्टेडियम, सगळ्यात मोठा सामना...

IND vs AUS Final: क्रिकेटच्या जगातील सर्वात मोठे स्टेडियम, सगळ्यात मोठा सामना आणि दिग्गज संघ…जाणून घ्या फायनलबाबत

अहमदाबाद: दर चार वर्षांनी एक दिवस क्रिकेटच्या जगातील सर्वात मोठा महामुकाबला खेळवला जातो. आज तो दिवस आला आहे. क्रिकेट विश्वचषकातील अंतिम महामुकाबला आहे आणि क्रिकेट जगतातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर आज क्रिकेटच्या जगातील दोन दिग्गज संघ आमनेसामने येत आहे. पाचवेळा वर्ल्डकप विजेता ऑस्ट्रेलिया आणि दोन वेळा वर्ल्डकप विजेता भारतीय संघ यांच्यातील हा सामना दुपारी २ वाजता सुरू होणार आहे.

या महामुकाबल्याआधी आणि त्या दरम्यान अनेक इव्हेंट्स असणार आहे. एअर शो तसेच दुआ लीपाचा परफॉर्मन्ससोबत बरंच काही आहे. देश-परदेशातील अनेक मोठमोठ्या व्यक्ती या दरम्यान स्टेडियममध्ये उपस्थित राहणार आहेत. अहमदाबादमधी ज्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा सामना रंगत आहे त्याची प्रेक्षक क्षमता सव्वा लाखाहून अधिक आहे. अशातच या महामुकाबल्यात माहोल कसा असेल हे शब्दात व्यक्त करणे नक्कीच कठीण आहे . आतापर्यंत झालेल्या वर्ल्डकपच्या फायनलमध्ये आतापर्यंतचा हाच सगळ्यात मोठा भव्य दिव्य वर्ल्डकप फायनल असू शकतो.

वर्ल्डकप २०२३मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन्हीही संघ चॅम्पियन्सप्रमाणे खेळले आहेत. टीम इंडियाने आपले सर्व १० सामने जिंकत फायनलमध्ये एंट्री घेतली आहे. तर ऑस्ट्रेलियाने सुरूवातीचे दोन सामने गमावल्यानंतर सलग ८ सामने जिंकत फायनलमध्ये एंट्री घेतली आहे.

हेड टू हेड रेकॉर्ड

दोन्ही संघादरम्यान आतापर्यंत १५० सामने झाले आहेत. यात ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक ८३ सामने जिंकले आहेत. तर भारतीय संघाला ५७ सामने जिंकता आले. इतर सामने अनिर्णीत राहिले.

कशी असू शकते संघांचे प्लेईंग ११

टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज/आर अश्विन.

ऑस्ट्रेलिया: ट्रेविस हेड, डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव स्मिथ, मार्नस लाबुशेन/मार्कस स्टोयनिस, ग्लेन मॅक्सवेल, जोश इंगलिस (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिशेल स्टार्क, एडम जाम्पा, जोश हेजलवुड.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -