अहमदाबाद : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND Vs AUS) यांच्यात अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Narendra Modi Stadium) अंतिम सामन्यात भारताची निराशाजनक कामगिरी सुरु आहे. मागच्या सामन्यात दमदार कामगिरी केलेला मोहम्मद शामी आता फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. त्यामुळे भारतीयांच्या आशा वाढल्या होत्या. मात्र, दहाव्याच चेंडूवर शामीने भारताच्या पदरी निराशा पाडली. शामी केवळ ६ धावांवर बाद झाला.
त्यानंतर लगेच केवळ एक धाव काढत जसप्रीत बुमराह तंबूत परतला. तीन चेंडूंमध्ये त्याला केवळ एक रन करता आला. भारताचा स्कोअर ८ बाद २१४ धावा राहिला. सध्या सूर्याकुमार यादव आणि के. यादव फलंदाजी करत आहेत. भारताकडे आता केवळ पाच षटक उरले आहेत.