अहमदाबाद: रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने विश्वचषक २०२३च्या फायनलमध्ये पहिल्यांदा बॅटिंग करताा २४० धावांवर ऑलआऊट झाला. ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज डावाच्या सुरूवातीपासूनच टीम इंडियावर दबाव टाकताना दिसले. भारतासाठी केएल राहुलने सर्वाधिक ६६ धावांची खेळी केली. याशिवाय विराट कोहलीने ५४ धावा केल्या. आता भारताला या कमी धावसंख्येच्या आव्हानाला ऑस्ट्रेलियाला रोखावे लागेल. कपिल देवच्या संघाने १९८३च्या वर्ल्डकपमध्ये १८३ धावांचे तुटपुंजे आव्हान असतानाही वर्ल्डकप जिंकला होता.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या बॅटिंगसाठी उतरलेला भारताचा संघ सुरूवा तीला अडखळताना दिसला. दरम्यान कर्णधार रोहित शर्माने १५१.६१च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना ४७ धावांची खेळी कर संघाला चांगली सुरूवात करून दिली. याची संघाला गरज होती. भारताने पहिल्या १० ओव्हरमध्ये २ बाद ८० धावा केल्या होत्या. यानंतर मात्र भारतीय संघावर दबाव येत गेला. यानंतर मात्र ते बाहेर येऊ शकले नाहीत.
ऑस्ट्रेलियाची घातक गोलंदाजी
ऑस्ट्रेलियाकडून या सामन्यात शानदार गोलंदाजी पाहायला मिळाली. मिचेल स्टार्कने ३ विकेट घेतल्या. या दरम्यान त्याने १० षटांत ५५ धावा दिल्या. याशिवाय कर्णधार पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूडने २-२ विकेट मिळवल्या. तर ग्लेन मॅक्सवेल आणि अॅड झाम्पाने १-१ विकेट मिळवल्या.