अहमदाबाद : क्रिकेट विश्वचषकातील भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND Vs AUS) यांच्यातील अंतिम सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Narendra Modi Stadium) सुरु आहे. यात भारताने ऑस्ट्रेलियाला २४१ धावांचे तुटपुंजे आव्हान दिले आहे. त्यामुळे अख्खा जबाबदारी भारताच्या गोलंदाजांवर आली आहे.
सुरुवातीलाच तीन चौकार ठोकत ऑस्ट्रेलियाने दमदार सुरुवात केली होती. केवळ एका षटकात त्यांनी पंधरा धावा केल्या. त्यामुळे भारतीयांची धाकधूक वाढली होती. मात्र, मोहम्मद शामीने डेविड वॉर्नरची विेकेट काढत भारतीयांना दिलासा दिला आहे. शामीच्या गोलंदाजीवर विराटकडे झेल देऊन वॉर्नर बाद झाला आहे.