Share

एअरबीएनबी एक ऑनलाइन मार्केटप्लेस, हाॅस्पिटॅलिटी सेवा असून जी लोकांना अल्पकालीन निवासासाठी भाड्याने अपार्टमेंट, होम स्टे, हॉस्टेल, हॉटेल देण्यास मदत करते. जगातील सर्व महत्त्वाच्या शहरांत आपल्याला परवडेल अशा घराचे आरक्षण करता येते. त्यांच्या अॅपद्वारे आपल्याला हव्या असलेल्या मुदतीत, निवडलेल्या देशात, निवडलेल्या भागातील उपलब्ध घरे आतून बघून घर पसंत पडल्यास बुक करता येते.

गुलदस्ता : मृणालिनी कुलकर्णी

पर्यटनासाठी परदेशात फिरायला जाताना व्हिसासाठी कोठे राहणार? हे सर्वात महत्त्वाचे ठरते. ‘बुकिंगडाॅटकॅाम’, ‘मेकमायट्रिप’ अशा अनेक प्लॅटफॉर्मच्या धर्तीवर परदेशात स्वस्तात आणि मनाजोगे राहण्याची सोय म्हणजे ‘एअरबीएनबी होय.

एअरबीएनबी म्हणजे परदेशात सुसज्ज घरात भाड्याने राहण्याची सोय. एअरबीएनबी एक ऑनलाइन मार्केटप्लेस, हाॅस्पिटॅलिटी सेवा असून जी लोकांना अल्पकालीन निवाससाठी भाड्याने अपार्टमेंट, होम स्टे, हॉस्टेल, हॉटेल देण्यास मदत करते. जगातील सर्व महत्त्वाच्या शहरांत आपल्याला परवडेल अशा घराचे आरक्षण करता येते. त्याच्या संकेतस्थळाला भेट देऊन, नियम वाचा.

सर्वात प्रथम परदेशात कोठे जायचे? काय पाहायचे? किती माणसे आणि किती दिवसासाठी हे नक्की झाल्यावर त्यांच्या अॅपद्वारे आपल्याला हव्या असलेल्या मुदतीत, निवडलेल्या देशात, निवडलेल्या भागातील उपलब्ध घरे आतून बघा. रितसर मालकाचे नाव, पत्ता, ई-मेल, फोन मिळाल्यावर मालकाशी सतत संवाद साधा. तेथे राहून गेल्याची मते वाचा. भाडे पडताळून पाहा. घर पसंत पडल्यास क्रेडिट कार्डवरून बुक करा. काही काळापर्यंत निवास आरक्षण रद्द करण्याचीही मुभा असते.

परदेश प्रवासातील एअरबीएनबीचा आमचा अनुभव –

२०१७/१८च्या उन्हाळ्याच्या सुट्टीत, आम्ही सातजण १७ दिवसांसाठी लंडनला आणि ६ दिवसांसाठी स्विझर्लंडला गेलो होतो. लंडनच्या विमानतळावर उतरताच प्रथम एकमेकांशी संवाद साधण्यासाठी प्रत्येकी दहा पौंडची सीमकार्ड घेतली. सुरक्षितेसाठी रिसेप्शनवरून नोंद करून टॅक्सी ठरवली.

हायडर्सन (Haderson) स्टेशनजवळ सेसिल रोडवरील मालकिणीने आमचे स्वागत केले. ओळख शेअर केली. तीन बेडरूम हॉल किचनमधील सामान दाखवून घराची चावी आम्हाला दिली. नळाचे पाणी पिण्यास योग्य. नळाला चोवीस तास गरम पाणी, खोलीत हिटर, पोळपाट व प्रेशर कूकर वगळता प्रत्येक वस्तूचे डझनांनी सेट.

स्टेशनजवळ असल्याने ट्रेनने आजूबाजूचा परिसर पूर्ण पहिला. सात दिवस रोज कोठे जायचे, हे आधीच ठरविल्याने एकही दिवस फुकट गेला नाही. नोकरीच्या वाटेत घर असल्याने सकाळीच चावी नेताना घराचे मालक विश्वासाने म्हणाले, ‘मी चावी नेली तरी तुम्ही तुमचे सावकाशीने आवरून दार ओढून निघा.’

रात्रीचे लंडन पाहण्यासाठी, बुकिंगडाॅटकाॅममार्फत आयत्या वेळी लंडनच्या मुख्य शहरात काॅवेंट गार्डन येथे ट्रफेल चौकात अत्याधुनिक हॉटेलचा लूक आणि मुबलक अत्याधुनिक सामान साहित्य असलेल्या दुसऱ्या मजल्यावर दोन आणि तिसऱ्या मजल्यावर एक खोली अशा पेंटाहाऊसमध्ये आम्ही तीन दिवस राहिलो. दोन रात्र दिव्याचा झगमगाटसह लंडनचे नाईट लाईफ पाहिले.

तेथूनच ट्रेनने स्कॉटलंडची राजधानी एडिनबर्ग येथे एअरबीएनबीद्वारे आधीच बुकिंग केलेल्या स्टेटफोर्ड भागात ‘द मालटिंग्स’ या कॉलनीत तीन रात्र राहिलो. या कॉलनीला सिक्युरिटी असल्याने ब्लॉकची मालकीण यंग लेडी गेटच्या बाहेरच उभी होती. सेन्सरने फक्त काही सेकंदासाठी मुख्य दरवाजा उघडतो. फोल्डिंग फर्निचरसहित मुंबईचा लहान ब्लॉक असलेल्या या घरात पुस्तके, डीव्हीडी कॅसेट, खेळणी भरपूर होती.

तिसऱ्या दिवशी एडिनबर्गवरून ट्रेनने संध्याकाळी लंडनच्या हीथ्रो विमानतळावर आलो. पुन्हा संध्याकाळी ७ ते पहाटे ४ पर्यंतच्या विश्रांतीसाठी मोबाइलवरून विमानतळावरच योटेल या हॅाटेलात सुदैवाने खोली मिळाली. अंदाजे रुपये सहा हजार भरून रूमवर जाताच कल्पनेच्या बाहेर चकित झाले. डबलडेकर डबल बेड, टेबल खुर्ची, जाड दुहेरी पडदा असलेली सर्व सोयींनी युक्त वॉशरूम, कॉम्प्लिमेंटरी म्हणून पाण्याच्या बाटल्या, चहा-कॉफी, बिस्कीट, ब्रश, टॉवेल सारे होतेच. विमानतळावरच राहिल्याने सकाळी निघताना लगेच एअरपोर्टच्या आत.

एअरबीएनबीच्या घरात, खायला आम्ही काही इन्स्टंट व घरचे टिकाऊ पदार्थ आणले होतेच. ब्रेड बटर-अंडी, एखादी रसदार भाजी किंवा रात्रीसाठी डाळभात करून सकाळी ११ ला बाहेर पडत असू. दुपारची कॉफी, कधीतरी रात्रीचे जेवण बाहेर.

सतरा दिवसांच्या वास्तव्यात तीन घरे बदलली. चौथे काही तासांसाठी एअरपोर्टवर. स्वित्झर्लंडमध्ये दोन जागी राहिलो. प्रत्येक ठिकाणचे वैशिष्ट्यपूर्ण फर्निचर, सर्व ठिकाणी टॉवेल, पांघरून, चहा-कॉफीचे विविध प्रकार. स्वतःच्या सोयीनुसार, आवडीनुसार चाललो, फिरलो, थांबलो. इतरांशी बोललो. खूप आनंद घेतला.

ऑस्ट्रेलियातील आम्हा दोघांचे एअरबीएनबीचे अनुभव –

केर्न्सच्या लेक स्ट्रेटजवळील इकलीप अपार्टमेंटमध्ये कोरियन माणसाच्या निवासस्थानी रात्री पोहोचलो. त्यांनी दाखवलेले घर (खोली) नि यात फरक होता. मुख्यतः तेथे नोकरी करणाऱ्या दोन मुलींच्या दोन बेडरूम, किचन आणि हॉल सामायिक. आमची रूम आत होती. नॉनव्हेजचा वास. आम्ही नाराजी दाखविल्यावर तो बदलून द्यायला तयार होता; परंतु पैसे लगेच मिळणार नव्हते.पटकन हॉटेल मिळाले नाही. असुरक्षित वाटले. एका चित्रपटात सैफ अलीला एक मुलगी लुबाडते तो प्रसंग बरोबर त्यावेळी आठवला. तिघे कोरियन कुणाला बोलवून आम्हाला काही केले तर? वरून शांत राहत ती रात्र काढली. सकाळी बाहेर पडल्यावर लक्षात आले ही जागा मध्यवर्ती आहे. बाजार, बस, रेल्वे, कोठेही फिरायला जाण्याचे सुरुवातीचे स्थान इथेच आहे. घरात काहीही सोयी नव्हत्या. टॉवेल, साबण कमी प्रतीचे होते. पासपोर्ट, पैसे बरोबर घेऊन आम्ही फिरलो. कुठेतरी चौकशीला कमी पडलो. शेअरिंग नको असा स्पष्ट खुलासा करायला हवा होता.

याच्या एकदम उलट अनुभव, ‘मेलबर्न’ला वेलिंग्टन स्ट्रीटवर सेंट किडदा येथे टॅक्सीने पोहोचलो. आम्हाला चावीचा बॉक्स न कळल्याने चेहऱ्यावरील भीती पाकिस्तानी टॅक्सी ड्रायव्हरच्या लक्षात आली. त्यांनी बॉक्समधील चावी काढून बिल्डिंगच्या बाहेरील सेन्सर दार उघडून, आम्ही आत जाईपर्यंत थांबला. बंद दारे असलेली ही ब्लॉक बिल्डिंग. एकच लहान खोली अतिशय सुव्यवस्थित, उच्च प्रतीच्या खाण्याने, सामानाने भरलेले ते घर. तीन रात्र येथे राहिलो. जाताना दार लोटून निघालो.

मला वाटते –

१. शक्यतो एअरबीएनबीचे घर शहराच्या मध्यभागी किंवा स्टेशनजवळ आरक्षित केल्यास प्रवासाचा वेळ आणि
पैसे वाचतात.
२. ज्येष्ठ नागरिकांनी एअरबीएनबी राहू नये.
३. निवासस्थानी दिवसा पोहोचावे.
४. माणसे जास्त असतील, एकत्रच राहायचे, फिरायचे असेल, तर एअरबीएनबी हा पर्याय उत्तम.
५. आमच्या घरातील तरुण पिढीचा अनुभव चांगला आहे. फिरा नि समृद्ध व्हा.

mbk1801@gmail.com

Recent Posts

KKR vs GT, IPL 2025: गुजरातविरुद्ध घरच्या मैदानावर कोलकत्त्याचा लाजिरवाणा पराभव

कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…

4 hours ago

उबाठाला राणेंचा दणका! सिंधुदुर्गात होणार १५०० कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश!

२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…

5 hours ago

ही कणकवली नव्हे, कुडाळ आहे! निलेश राणे यांच्याशी पंगा नको!

माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…

5 hours ago

नाल्यातून गाळ काढताना ३० सेकंदाचा व्हिडीओ कंत्राट कंपनीला बंधनकारक

लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…

6 hours ago

PM Modi : आजची धोरणं, उद्याचं भारत! – पंतप्रधान मोदींचा नागरी सेवकांना मंत्र

PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…

6 hours ago