Sunday, July 7, 2024
Homeताज्या घडामोडीभद्रकाली पाकिस्तानात आहे का?

भद्रकाली पाकिस्तानात आहे का?

नाशिक पोलीस प्रशासनाच्या अजब गजब नियमाने व्यापारी वर्गात संताप!

नाशिक : एकीकडे शहरातील दुकाने व हॉटेल्स वेळेत बंद करण्याचा नाशिक पोलिसांचा फतवा असताना दुसरीकडे भद्रकाली परिसरात मात्र या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होत असल्याने पोलीस आयुक्तांनी वेगवेगळ्या भागासाठी वेगवेगळे नियम तयार केले आहेत का? असा सवाल व्यापारी वर्ग व सर्वसामान्य नागरिक विचारताना दिसत आहे. तर भद्रकाली पाकिस्तानात आहे की काय? असाही संतप्त सवाल परिसरातील नागरिक विचारताना दिसत आहे.

भद्रकालीतील जुन्या नाशकात बागवांनपुरा, कोकणी पुरा, चौक मंडई, दूध बाजार, सारडा सर्कल या भागात मध्य रात्री पर्यंत दुकाने व हॉटेल्स सुरू ठेवून नियम धाब्यावर बसवल्याचे दिसून येत आहे. तर छत्रपती शिवाजी चौक, चव्हाटा, पाटील गल्ली, आझाद चौक व शहर परिसरातील भागातील हॉटेल्स ला मात्र १० वाजताच बंद करण्याचे फर्मान भद्रकाली पोलिसांकडून सोडले जात आहे. त्यामुळे भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्याकरिता पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी वेगळे नियम तयार केले आहेत का? असेही बोलले जात आहे.

पोलीस आयुक्तांनी याची दखल न घेतल्यास राज्याचे गृहमंत्री व पोलीस महासंचालक यांच्याकडे यासंदर्भात तक्रार करून चौकशीची मागणी करण्यात येईल. असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच मा. गृहमंत्री यांनी चौकशी लावून सर्व सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतल्यास सर्व गोष्टी बाहेर येतील आणि त्यात सर्व टायमिंग आणि त्या ठिकाणी काय चालते सर्व गोष्टी बाहेर येण्यास वेळ लागणार नाही

‘टीम प्रहार’चा ‘रिॲलिटी चेक’

रात्रीच्या फेरफटक्यात आढळून आला पुढील धक्कादायक प्रकार

हॉटेल इम्पेरियल, हॉटेल कैया फास्ट फूड, बॉम्बे स्वीट, हॉटेल छोटे मिया, कोकणी दरबार, अल खतीब, शब्बीर पान स्टॉल, अली चायवाला, रॉयल लिफ हुक्का वाला, अल्ला मोहमदी हॉटेल, अल अकबर रेस्टॉरंट, हाजी दरबार रेस्टॉरंट, हाजी चायवाला, ए.एस. सेल कपड्याचे दुकान, सलार सिख पराठा, शेहणाज केटर्स, फाऊंटन गाजी दरबार, बिस्मिल्ला टी स्टॉल, हॉटेल इकबाल आदी दुकाने रात्री १२:३० वाजेच्या सुमारा पर्यंत सुरू असल्याचे टीम प्रहार च्या रिॲलिटी चेक” मध्ये निदर्शनास आले.

भद्रकाली पोलिसांना हप्ते तर सुरू नाही ना?

ज्या ठिकाणी नियमांचे उल्लंघन होते. त्या ठिकाणी पोलिसांना हप्ते सुरू आहेत. अशी चर्चा दबक्या आवाजात काही ठिकाणी ऐकायला मिळते. ज्या ठिकाणी हप्ते देत नाही. त्या ठिकाणी मात्र नियमांचे कारण पुढे करून दुकाने व हॉटेल्स बंद करण्यात येतात. त्यामुळे असाच तर प्रकार भद्रकाली व परिसरात सुरू नाही ना? अशी देखील शंका या निमित्ताने नागरिकांच्या मनात उपस्थित होताना दिसत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -