लोअर परेल उड्डाणपुलाचे केले होते बेकायदेशीररित्या उद्घाटन
मुंबई : लोअर परेल येथील डिलाई रोड ब्रिजच्या लेनचे उद्घाटन केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंसह (Aditya Thackeray) पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात मुंबई महापालिकेच्या रोड डिपार्टमेंटकडून तक्रार दाखल करण्यात आली आणि त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आाला आहे.
गुरूवारी आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात बेकायदेशीररित्या आणि शासकीय कामात अडथळा आणून डीलाई रोडच्या दुसऱ्या लेनचे काम अपूर्ण असताना उद्घाटन करण्यात आले होते.
डिलाई रोडवर इतर कामे अपूर्ण असताना आणि साधारणपणे सात दिवसानंतर या ब्रिजचे काम पूर्ण करून लेन सुरू करण्याचे नियोजन मुंबई महापालिकेने केलेले होते. असे असताना अशाप्रकारे उद्घाटन करणे बेकायदेशीर असल्याचे मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. महापालिकेच्या नियोजित उद्घाटनापूर्वीच आदित्य ठाकरेंनी स्टंटबाजी करत लपून छपून रात्रीच्या वेळेस या पुलाचे उद्घाटन करून त्यावरून वाहतूक सुरू केली.