मुरूड : मुरुडमधील काशिद समुद्रकिनारी पर्यटनासाठी गेलेला पुण्यातील २१ वर्षीय जुनेद अतिक शेख (रा. घंटेवाडी रोड, हडपसर, जि. पुणे) हा तरुण समुद्रात बुडून बेपत्ता झाला. ही घटना शुक्रवारी (दि.१७) सकाळी घडली.
पुण्यातील २० जणांचा समुह काशिद समुद्रकिनारी पोहण्यासाठी गेला. यातील जुनेद शेख हा तरुण समुद्रातून बाहेर आला नाही. ही बाब त्याची आई समिना अतिक शेख यांच्या लक्षात येताच त्यांनी सहका-यांना सांगून समुद्रकिनारी शोध सुरु केला. तसेच याबाबत पोलिसांत कळविले. सध्या पोलीस व लाईफ गार्ड तरुणाचा शोध घेत आहेत.