Nana Patekar Fan Viral Video : नानांनी माफी मागितली पण चापट खाल्लेला फॅन म्हणतो 'माझी इज्जत गेली...

त्या फॅनने व्यक्त केल्या भावना


उत्तरप्रदेश : दोन दिवसांपूर्वी नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी शूटिंग सुरु असताना सेल्फी काढायला आलेल्या एका फॅनला चापट मारल्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल (Viral Video) झाला होता. त्यामुळे चाहत्यांनी नानांना बरंच ट्रोल केलं. या प्रकरणी शूट सुरु असलेल्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाने तो सीनचाच एक भाग असल्याचे सांगितले. तर नानांनी देखील एक व्हिडीओ पोस्ट करत घडलेला घटनाक्रम सांगितला. चापट खाल्लेला फॅन हा क्रू मेंबरपैकीच असावा असं वाटल्याने नानांनी जी रिहर्सल केली होती त्यानुसार त्या फॅनला चापट मारली. नानांनी या व्हिडीओमध्ये सर्व चाहत्यांची माफी देखील मागितली आहे.


यानंतर आता चापट खाल्लेल्या फॅनने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. नानांनी म्हणतायत त्याप्रमाणे आपल्याला पुन्हा बोलावलं वगैरे नाही असं त्याने सांगितलं आहे. तो म्हणाला, 'घाटावर चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे की नाही किंवा कोणी सेलिब्रिटी तेथे आहे की नाही याची मला कल्पना नव्हती. मी नेहमीप्रमाणे घाटावर आंघोळीसाठी गेलो होतो. जेव्हा मला समजले की, जवळच नाना पाटेकर यांच्या एका चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. त्यानंतर मी नाना पाटेकर यांच्याकडे गेलो. तिथल्या बाऊन्सरने मला थांबवण्याचा प्रयत्न केला पण मी कसाबसा त्यांच्याजवळ गेलो.


नाना पाटेकर आपल्या व्हिडीओमध्ये म्हणाले होते की, 'मला वाटले की तो आमच्या क्रूपैकी एक आहे, म्हणून मी त्याला रिहर्सलनुसार त्याला मारलं आणि त्याला निघून जाण्यास सांगितले. नंतर मला कळले की तो क्रूचा भाग नव्हता, म्हणून मी त्याला परत बोलावले, पण तो पळून गेला'. याबाबत त्या फॅनला प्रश्न केला असता त्याने मात्र वेगळाच खुलासा केला. तो म्हणाला, 'मी सेल्फी घ्यायला जाणार तोच नानांनी मला चापट मारली आणि मला बाऊन्सरने बाहेर काढलं. माझ्या विभागात सर्वांना ही घटना समजली असल्याने माझी इज्जत गेली आहे. याशिवाय नाना पाटेकर यांनी मारल्यावर मला परत बोलावलं, ते सर्व खोटं आहे. असं काही घडलंच नाही'.



नानांवर पोलीस कारवाई करणार का? असा प्रश्न विचारताच फॅनने नकार दिला. दरम्यान, नाना पाटेकर म्हणाले, 'मी कधीही कोणाला फोटो काढण्यास नकार दिला नाही. मी असे कधीच केले नसते. जे काही झाले ते चुकून झाले. काही गैरसमजांमुळे हे घडले. मला क्षमा करा. मी पुन्हा असं कधीच करणार नाही' अशी नानांनी व्हिडीओमध्ये माफी मागितली आहे.

Comments
Add Comment

PM Narendra Modi : 'युवकांना स्वावलंबी बनवणे हे सरकारचे ध्येय'

नवी दिल्ली: 'विकसित वायब्रंट व्हिलेज कार्यक्रम २०२६' च्या सहभागींसोबत रविवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे

Amit Shah : युवा पिढी आणि विद्यार्थी आमच्यासाठी महत्वाचे : अमित शाह

धर्मेंद्र प्रधान यांनी केलेल्या कामाचंही कौतुक नवी दिल्ली : भाजप कार्यकर्त्यांसाठी पदापेक्षा देश खूप जास्त

Karnataka Politics : '२०२८ ची कर्नाटक विधानसभा निवडणूक लढवणार नाही': माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या

बंगळुरु : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी निवडणूक राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली आहे.

Assam Factory Blast : आसाममधील रॉड मॅन्युफॅक्चरिंग कारखान्यात भीषण स्फोट; ४ कामगारांचा मृत्यू

दिसपुर : आसाममधील कछार जिल्ह्यात रविवारी सकाळी रॉड उत्पादन करणाऱ्या एका कारखान्यात भीषण स्फोट होऊन किमान चार

Viral Love Story : NEET आंदोलनात गेले अन् जुळली रेशीमगाठ; जंतर-मंतरवर घडली अनोखी प्रेमकहाणी

Viral Love Story : दिल्लीतील जंतर-मंतरवर झालेले नीट परीक्षा गैरप्रकाराविरोधातील आंदोलन देशभर चर्चेत

Kargil Vijay Diwas : कारगिलपासून ऑपरेशन सिंदूरपर्यंत! भारतीय लष्कराच्या 'या' १० मोहिमांनी जगाला दाखवली ताकद

ऑपरेशन विजय (1999) (Operation Vijay) कारगिल युद्धात पाकिस्तानी घुसखोरांना हुसकावून लावत भारताने २६ जुलै १९९९ रोजी विजय