Grant Road fire news : ग्रँट रोड येथील इमारतीला भीषण आग; लेव्हल २ घोषित

८ अग्निशमन गाड्या दाखल


मुंबई : मुंबईतील ग्रँट रोड (Grant Road) परिसरात असलेल्या धवलगिरी (Dhavalgiri)इमारतीमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ऑगस्ट क्रांती रोड (August Kranti Road) या परिसरातील ही इमारत आहे. इमारतीच्या ११ आणि १२ व्या मजल्यावर सकाळी साडेनऊच्या सुमारास आग लागली. या आगीचे कारण मात्र कळू शकलेले नाही.


महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) ताज्या अपडेटनुसार, ही आग ८व्या आणि १२व्या मजल्यावरील इलेक्ट्रिक वायरिंग, इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन, फर्निचर, दरवाजे, घरगुती वस्तू इत्यादींच्या नुकसानास कारणीभूत ठरली आहे. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग विझवण्यासाठी इमारतीच्या फिक्स फायर फायटिंग सिस्टीमच्या दोन छोट्या होज लाइन्स आणि दोन फर्स्ट एड लाइन कार्यरत आहेत.


आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी घटनास्थळी ८ अग्निशमन दलाच्या गाड्या, ६ जंबो टँकर आणि स्थानिक पोलीस दाखल झाले आहेत. आग भीषण असल्याने 'लेव्हल २' घोषित करण्यात आली आहे. २१ व्या आणि २२ व्या मजल्यावर अडकलेल्या लोकांना अग्निशमन दलाच्या जवानांनी टेरेसवर सुरक्षितपणे बाहेर काढले. १५ व्या मजल्यावर अडकलेल्या सुमारे ७-८ लोकांना अग्निशमन दलाच्या जवानांनी वाचवले आणि जिन्याने टेरेसवर हलवले.

Comments
Add Comment

सोशल मीडियावर महिलांविषयी आक्षेपार्ह टिप्पणी करणे भोवणार

गृहमंत्रालयासोबत समन्वय साधून कठोर कारवाईचे मंत्री आदिती तटकरे यांचे संकेत मुंबई : सोशल मीडियाच्या माध्यमातून

कंत्राटदारांकडून वेळेत बस न मिळाल्याने मुंबईत 'बेस्ट'चा तुटवडा

राज्यमंत्र्यांची कबुली; स्क्रॅपिंग पॉलिसीचाही बेस्टला मोठा फटका मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेते महामंडळे पुढील अधिवेशनाच्या आत स्थापन करणार

-- मंत्री आशिष शेलार यांची ग्वाही; पत्रकारांच्या समस्यांवर व्यापक बैठक घेणार मुंबई : पत्रकार आणि वृत्तपत्र

बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालवणाऱ्या कंपनीचा तात्पुरता परवाना रद्द..-- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : मुंबई व आसपासच्या भागात वाढत असलेल्या बेकायदा बाईक टॅक्सी सेवेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कठोर

Navi Mumbai : सोसायटीच्या पुनर्विकास बैठकीत राडा; अध्यक्षांच्या मुलाकडून बाहेरील तरुणांच्या मदतीने रहिवाशांना मारहाण

नवी मुंबई : नवीन पनवेल येथे जीर्ण इमारतीच्या पुनर्विकास बैठकीला हिंसक वळण मिळाले. नवीन पनवेल सेक्टर १४ येथील

९ मार्च पासून नवीन ऑटो रिक्षा परवान्यांना स्थगिती..

-- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली घोषणा मुंबई : वाढती वाहतूक कोंडी रोखणे व शहरी प्रदूषणाला आळा