Thursday, July 25, 2024
Homeताज्या घडामोडीGrant Road fire news : ग्रँट रोड येथील इमारतीला भीषण आग; लेव्हल...

Grant Road fire news : ग्रँट रोड येथील इमारतीला भीषण आग; लेव्हल २ घोषित

८ अग्निशमन गाड्या दाखल

मुंबई : मुंबईतील ग्रँट रोड (Grant Road) परिसरात असलेल्या धवलगिरी (Dhavalgiri)इमारतीमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ऑगस्ट क्रांती रोड (August Kranti Road) या परिसरातील ही इमारत आहे. इमारतीच्या ११ आणि १२ व्या मजल्यावर सकाळी साडेनऊच्या सुमारास आग लागली. या आगीचे कारण मात्र कळू शकलेले नाही.

महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) ताज्या अपडेटनुसार, ही आग ८व्या आणि १२व्या मजल्यावरील इलेक्ट्रिक वायरिंग, इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन, फर्निचर, दरवाजे, घरगुती वस्तू इत्यादींच्या नुकसानास कारणीभूत ठरली आहे. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग विझवण्यासाठी इमारतीच्या फिक्स फायर फायटिंग सिस्टीमच्या दोन छोट्या होज लाइन्स आणि दोन फर्स्ट एड लाइन कार्यरत आहेत.

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी घटनास्थळी ८ अग्निशमन दलाच्या गाड्या, ६ जंबो टँकर आणि स्थानिक पोलीस दाखल झाले आहेत. आग भीषण असल्याने ‘लेव्हल २’ घोषित करण्यात आली आहे. २१ व्या आणि २२ व्या मजल्यावर अडकलेल्या लोकांना अग्निशमन दलाच्या जवानांनी टेरेसवर सुरक्षितपणे बाहेर काढले. १५ व्या मजल्यावर अडकलेल्या सुमारे ७-८ लोकांना अग्निशमन दलाच्या जवानांनी वाचवले आणि जिन्याने टेरेसवर हलवले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -