Monday, July 1, 2024
Homeताज्या घडामोडीLower Parel Flyover : आदित्य ठाकरेंकडून रात्री उद्घाटन; मात्र दुसर्‍याच दिवशी लोअर...

Lower Parel Flyover : आदित्य ठाकरेंकडून रात्री उद्घाटन; मात्र दुसर्‍याच दिवशी लोअर परळ उड्डाणपुलाची दुसरी लेन बंद

काम पूर्ण न झाल्याने घेतला निर्णय; नागरिकांना मात्र नाहक त्रास

आपलं अपयश झाकण्यासाठी केलं उद्घाटन : मनसेचा आरोप

मुंबई : मुंबईतील लोअर परळ येथील उड्डाणपुलाच्या (Lower Parel Flyover) दुसर्‍या लेनचं काल ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. मात्र, लगेचच ही लेन बंद करण्याची वेळ आली आहे. पुलाचं काम पूर्ण न झाल्यामुळे पालिकेककडून हा निर्णय घेण्यात आला आहे. हा पुन्हा एकदा राजकारणाचा विषय बनला असून लोकांची दिशाभूल करण्यात आली असा आरोप मनसेच्या वतीने करण्यात आला आहे.

‘मुंबई शहरात रात्री एक मोठी चोरी झाली. रात्री माजी मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र येतात, तीन आमदार येतात. ते उद्घाटन करतात आणि चोरी करतात. सहा वर्षांमध्ये एक पूल ते देऊ शकले नाहीत. आपलं अपयश झाकण्यासाठी ते रात्री येऊन चोरीने उद्घाटन करतात. त्यांनी आमच्या नागरिकांची फसवणूक केली आहे’, असा आरोप मनसेच्या पदाधिकार्‍यांनी केला.

लोअर परळचा उड्डाणपूल हा गेल्या ५ ते ६ वर्षांपासून राजकारणाचा विषय बनला आहे. या पुलाचं काम रखडून राहिल्यामुळे नागरिकांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यापूर्वीचा पूल हा लोअर परळ रेल्वे स्थानकाला थेट जोडलेला होता, मात्र आता तो पर्याय नसल्याने नागरिकांची गैरसोय झाली आहे. सप्टेंबर महिन्यात एक लेन प्रवासासाठी खुली करण्यात आली. मात्र, दुसरी लेन सुरु होण्यासाठी अजूनही मुहूर्त मिळत नसल्याने नागरिक संतापले आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी हा पूल सुरु करण्याबाबत कठोर भूमिका घेतली होती. मात्र, त्यानंतरही वारं तितकंसं बदललं नसल्याचीच चिन्हे आहेत. किती वर्षांपासून रखडलेला हा पूल अजून बनतोच आहे. शिवाय संध्याकाळच्या वेळी करीरोड व लोअर परळ अशा दोन्ही स्थानकांवरुन येणार्‍या प्रवाशांची प्रचंड गर्दी होते. मात्र, पूल उपलब्ध नसल्याने ही गर्दी पुलाखाली असणार्‍या जागेतून कशीबशी वाट काढत जाते. सहा वर्षांमधलं अपयश झाकण्यासाठी रात्री चोरुन उद्घाटन करण्यात आलं, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि त्यांना मुंबईकरांची माफी मागायला लावावी, अशी विनंती मनसे पदाधिकार्‍यांनी मुंबई महापालिकेला केली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -