
चलो जलाये दिप वहाँ, जहाँ अभी भी अंधेरा हैं l
नाशिक शहर अध्यक्ष प्रशांत जाधव यांचा संवेदनशील उपक्रम
नाशिक : प्रकाशाचा उत्सव म्हणून अवघा भारत दीपावलीचा (Diwali Festival) आनंद लुटत असला तरी अजूनही एखाद्या कोपऱ्यात या आनंदाची प्रकाश किरणे पोहचलेली नाहीत. याची जाणीव ठेवून भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष प्रशांत जाधव या तरुणाच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी अजूनही अंधारात चाचपडणाऱ्या ऊस तोडणी कामगारांच्या कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी करून संवेदनशील नेतृत्वाची प्रचिती दिली.
भारतीय जनता पार्टी नाशिक महानगराच्या वतीने पालावर रहाणाऱ्या ऊस तोडणी कामगार कुटुंबियांना दीपावली फराळ व त्यांच्या मुलांना फटाके देऊन तसेच त्यांच्या झोपडीच्या बाहेर पणत्या लावून दीपावली साजरी करण्यात आली.

पणतीच्या त्या मिणमिणत्या प्रकाशातही ऊस तोड कामगार कुटुंबातील चिमुकल्या चेहऱ्यावर आनंदाच्या तर प्रशांत जाधव यांच्यासह भाजपा कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाच्या छटा स्पष्ट दिसत होत्या. ऊस तोडणी कामगार कुटुंबीय व त्यांच्या मुलांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणाऱ्या भावना या उपक्रमाचे सार्थक निर्देशित करीत होत्या.
याप्रसंगी भाजप अध्यक्ष प्रशांत जाधव, सरचिटणीस सुनिल केदार, नाना शिलेदार व ॲड. शाम बडोदे, चिटणीस अमित घुगे व तुषार जोशी, उपाध्यक्ष प्रथमेश काश्मिरे, युवा मोर्चा अध्यक्ष सागर शेलार, सरचिटणीस प्रविण भाटे, उपाध्यक्ष संदिप शिरोळे, विनोद येवले, उमेश शिंदे, ऋषिकेश डापसे, आदित्य दोंदे, योगेश धात्रक, गोरख धात्रक, अमोल थेटे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.