मुंबई: नोकरी करणाऱ्यांसाठी सगळ्यात मोठी चिंता रिटायरमेंटबद्दल असते. यासाठी दर महिन्याला लोक पैशांची बचत करत असतात. रिटायरमेंट हे असे वय आहे जिथे पैशाच्या चिंतेविना आयुष्य काढायला मिळावे अशी इच्छा असते. लोकांचा प्रयत्न असतो की रिटायरमेंट नंतर घर चालवण्यासाठी कोणत्याही समस्या येऊ नयेत.
यामुळेच वयात असताना फायनान्शियल प्लानिंग करणे गरजेचे असते. रिटायरमेंटचे प्लानिंग वयाच्या तिशीतच करणे गरजेचे असते. आज आम्ही तुम्हाला अशा सरकारी योजनेबद्दल सांगणार आहोत ज्यात तुम्ही गुंतवणूक करून तुम्ही रिटायरमेंटला महिन्याला एक लाख रूपये मिळवू शकता.
खूप कामाची आहे ही सरकारी योजना
आम्ही ज्या योजनेबद्दल बोलत आहोत ती आहे नॅशनल पेन्शन सिस्टीम. जर तुम्ही रिटायरमेंटचे प्लानिंग करत आहात तर एनपीएस चांगला पर्याय आहे. ही सरकारी योजना आहे. केंद्र सरकारने १ जानेवारी २००४ला लाँच केली होती. २००९नंतर या खाजगी कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सुरू केली होती. एनपीएसमध्ये कमीत कमी २० वर्षे गुंतवणूक करणे गरजेचे असते. खाते सुरू केल्यानंतर वयाच्या ६० वर्षांपर्यंत अथवा मॅच्युरिटीपर्यंत यात गुंतवणूक करू शकता.
मिळतायत शानदार रिटर्न
जर तुम्ही एनपीएसचे मागचे रिटर्न पाहिले तर यात तुम्हाला ९ ते १२ टक्क्यांपर्यंत रिटर्न मिळू शकतात.
असे मिळणार एक लाख रुपये पेन्शन
जर तुम्हाला महिन्याला एक लाख रूपये पेन्शन हवी असेल तर या योजनेत तुम्ही गुंतवणूक करू शकता. तुम्हाला एनपीएसमध्ये दर महिन्याला १० हजार रूपये गुंतवावे लागतील. जर तुम्ही वयाच्या तिशीपासून याची सुरूवात करातला तर पुढील ३० वर्षांपर्यंत गुंतवणूक केल्यास चांगले रिटर्न मिळू शकतात. तर गुंतवणुकीवर १० टक्के वर्षाला रिटर्न मिळाल्यास तुमची पेन्शन वेल्थ २.२८ कोटी रूपये होणार. यानंतर तुमची मंथली पेन्शन १ लाख रूपये असणार आहे. तर रिटायरमेंटला एक कोटी रूपये एकरकमी मिळेल.