अहमदाबाद: एकदिवसीय विश्वचषक २०२३चा(world cup 2023) फायनल सामना १९ नोव्हेंबरला रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवला जाणार आङे. सामन्यातील पहिला फायनालिस्ट संघ भारत अहदमबादेत पोहोचला हे. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडला ७० धावांनी हरवले. आता भारतीय संघ अहमदाबादेत पोहोचला आहे. हॉटेलच्या बाहेर चाहत्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
टीम इंडिया अहमदाबाद पोहोचल्यानंतरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये चाहत्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. टीमची बस अहमदाबादेत पोहोचत असताना चाहत्यांमध्ये मोठा उत्साह आला. व्हिडिओमध्ये चाहत्यांचे प्रेम पाहायला मिळत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याच्या इराद्याने अहमदाबादेत पोहोचली आहे.
चाहते पुन्हा एकदा १२ वर्षांनी मेन इन ब्लूच्या हातात वनडे वर्ल्डकप ट्रॉफी पाहण्यास उत्सुक आहेत. भारतीय संघाने २०११मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. आता चाहते तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचा प्रयत्न करतील.
Team India have reached Ahmedabad.
– Time to win the World Cup. 🏆🇮🇳pic.twitter.com/rzTTIVbJnT
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 16, 2023
सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडला हरवले
स्पर्धेच्या लीग स्टेजमध्ये अजेय राहणाऱ्या टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडला ७० धावांनी हरवले होते. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्वचषकाचा सेमीफायनलचा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये खेळवण्यात आला होता. भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना ५० षटकांत ४ बाद ३९७ धावा केल्या होत्या. विराट कोहली आणि श्रेयस अय्यरने जोरदार शतक ठोकली होती. भारतासाठी मोहम्मद शमीने ७ विकेट घेतल्या होत्या.