मुंबई: क्रिकेट वर्ल्डकपच्या(cricket world cup) पहिल्या सेमीफायनल सामन्यात न्यूझीलंडला हरवत भारतीय संघाने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. गुरुवारी दुसरा सेमीफायनलचा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्समध्ये ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळवला जात आहे.
विश्वचषकातील अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या मैदाावरील पिचवर भारताचा सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहू शकतात.
विश्वचषकाचा अंतिम सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. टॉप चार संघामध्ये भारत, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सेमीफायनलचा सामना रंगला. आता ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ आमनेसामने आहेत. यातील जिंकणारा संघ भारताविरुद्ध खेळणार आहे.
क्रिकेट चाहत्यांकडे क्रिकेटचा महाकुंभ पाहण्याची शेवटची संधी
विश्वचषक २०२३चा फायनल सामन १९ नोव्हेंबर २०२३ला अहमदाबादमध्ये खेळवला जाणार आहे. बीसीसीआयकडून फायनल सामन्यांच्या तिकीटांचे लाईव्ह बुकिंग सुरू केली आहे. क्रिकेट चाहत्यांकडे क्रिकेटचा महाकुंभ पाहण्याची शेवटची संधी आहे.
अहमदाबाद स्टेडियममध्ये १.३२ लाख प्रेक्षक क्षमता
नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये १.३२ लाख प्रेक्षक क्षमता आहे. फायनल सामन्याआधी हे मैदान भारत वि पाकिस्तान महामुकाबल्यामध्ये प्रेक्षकांनी खचाखच भरला होता. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिला सेमीफायनल सामना १५ नोव्हेंबरला वानखेडेच्या स्टेडियममध्ये खेळवण्यात आला होता.