PM Modi on Mohammed Shami: मोहम्मद शमीचे चाहते झाले पंतप्रधान मोदी, कौतुक करताना बोलले असे काही की...

  107

मुंबई: भारताने न्यूझीलंडला ७० विकेटनी हरवत विश्वचषक २०२३च्या फायनलमध्ये स्थान मिळवले आहे. या सामन्यात शानदार गोलंदाजी करताना सात विकेट मिळवले. शमीच्या गोलंदाजीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांगले कौतुक केले.


पंतप्रधान मोदी कौतुक करत म्हटले, आजची सेमीफायनलची मॅच जबरदस्त आणि खास झाली. मोहम्मद शमीची शानदार गोलंदाजी क्रिकेट प्रेमींसाठी येणारी पिढी लक्षात ठेवेल. वेल प्लेड शमी!


य़ा वर्षी विश्वचषकात शमीने सहा सामन्यांत २३ विकेट मिळवले आहेत. न्यूझीलंडविुरुद्ध शानदार प्रदर्शनासाठी त्याला प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला.


 


सेमीफायनलमध्ये शमीने मिळवल्या ७ विकेट


भारताने या सामन्यात टॉस जिंकत फलंदाजी करताना ३९७ धावांचा विशाल स्कोर उभा केला. या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ ३२७ धावांवर सर्वबाद झाला. वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचा हा सलग १०वा विजय आहे.


भारताकडून मोहम्मद शमीने ९.५ षटकांत ५७ धावा देत ७ विकेट मिळवल्या. भारताच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींशिवाय अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, काँग्रेस नेते राहुल गांधी, अनुराग ठाकूर यांनीही शुभेच्छा दिल्या.



विराट कोहलीने तोडला सचिनचा रेकॉर्ड


न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये विराट कोहली आणि श्रेयस अय्यरने शानदार शतक ठोकले. कोहलीने या सामन्यात आपले ५०वे शतक पूर्ण केले. हे शतक ठोकताना कोहलीने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या ४९ शतकांचा रेकॉर्ड तोडला.

Comments
Add Comment

DSP सिराजला पोलीस विभागाने केला या खास अंदाजात सलाम, मोठ्या कामगिरीसाठी दिल्या शुभेच्छा

मुंबई: मोहम्मद सिराजला DSP सिराज यासाठी म्हटले जाते कारण तेलंगणा पोलीसमध्ये तो डीएसपी पदावर आहे. या मोहम्मद

सकाळी उठल्यावर वॉलपेपर लावले Believe आणि ठरवले देशासाठी जिंकायचे, ओव्हल विजयानंतर सिराजची प्रतिक्रिया

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीत भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आपल्या

IND vs ENG : चक दे इंडिया! ओव्हल कसोटीत टीम इंडियाने रचले अनेक विक्रम, इतिहासात होईल नोंद

लंडन: लंडनच्या ओव्हल मैदानावर पाचव्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने केवळ इंग्लंडला पराभूतच केले नाही तर अनेक

उत्कंठावर्धक सामन्यात मोहम्मद सिराजनं तारलं

लंडन : केनिंग्टन ओव्हल स्टेडियममध्ये रंगलेल्या भारत - इंग्लंड कसोटी सामन्यात भारत जिंकला. या उत्कंठावर्धक

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची