Sunday, July 14, 2024
Homeमहत्वाची बातमीNitesh Rane : पोलिसांना बघून घेण्याची धमकी देणा-या संजय राऊतांना नितेश राणे...

Nitesh Rane : पोलिसांना बघून घेण्याची धमकी देणा-या संजय राऊतांना नितेश राणे यांनी पाडले तोंडावर

परत धमकी दिल्यास असा कार्यक्रम करु की तोंडातून ब्र पण निघणार नाही

मुंबई : नाशिकमधील ठाकरे गटाचे (Thackeray Gat) उपनेते अद्वय हिरे यांना अटक झाल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सरकारवर आरोप करायला सुरुवात केली असता भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी आज राऊतांना चांगलेच खडसावले. ठाकरे गटाला बसत असलेले धक्के न पचल्यामुळे राऊत सरकारविरोधी वक्तव्यं करत असतात. मात्र, महायुती सरकारला (Mahayuti Government) दोष देणाऱ्या मविआच्या काळातच किती भ्रष्ट कारभार होत होता हे उघड करत नितेश राणे यांनी पुन्हा एकदा राऊतांना तोंडावर पाडले आहे.

नितेश राणे म्हणाले, आज संजय राजाराम राऊत पत्रकार परिषदेत आमच्या महाराष्ट्र पोलिसांना तुम्हाला २०२४ नंतर बघून घेऊ, अशा धमक्या देत होता. या सुक्या धमक्यांना तुझ्या घरचेही घाबरणं बंद झाले आहेत. आज महाराष्ट्राचे गृहमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, आमचं महायुतीचं सरकार आहे, तुझ्या मालकासारखं महाविकास आघाडीचं सरकार नाही. जिथे पोलिसांवर तुम्ही दबाव टाकायचात, त्यांच्याकडून खोट्या केसेस करुन घ्यायचात, असा आरोप नितेश राणे यांनी केला.

पुढे ते म्हणाले, तुझ्या मालकाच्या मुलानं दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूत प्रकरणात जी काही थेरं केली आहेत ती थेरं लपवण्यासाठी, पुरावे नष्ट करण्यासाठी तुम्ही पोलिसांना वापरायचात. सचिन वाझेला जावयाप्रमाणे तुम्ही घरी ठेवायचात. त्या डॉक्टर महिलेवर दबाव टाकण्यासाठी, तिच्यावर खोट्या केसेस दाखल करण्यासाठी जो पोलिसांचा वापर तुम्ही करायचात तसं आमच्या सरकारमध्ये होत नाही. म्हणून परत आमच्या महाराष्ट्र पोलिसांना धमक्या द्यायची हिंमत ठेवू नकोस नाहीतर तुझा एकदाच असा कार्यक्रम करावा लागेल की तोंडातून ब्र पण निघणार नाही, असं नितेश राणे यांनी संजय राऊतांना ठणकावलं.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -