
मुंबई: जर मला माझ्या कुटुंबाची साथ मिळाली नाही तर मी क्रिकेट सोडले असते. मी ३ वेळा जीव देण्याचा विचार केला होता. माझे घर २४व्या मजल्यावर होते आणि माझ्या कुटुंबाला वाटत होते की मी अपार्टमेंटमधून उडी मारणार नाही ना. हे शब्द होते भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमीचे. ती वेळ होती जेव्हा त्याने आपल्या जीवनातील सर्वात कठीण काळाची आठवण काढवली होती. मात्र जसजसा वेळ जात गेला तसतसा कठीण काळ सरत गेला आणि शमीने इतिहास लिहिला. आज शमीला जगातील गोलंदाजीचा हिरो मानले जाते.
शमीने बुधवारी न्यूझीलंडविरुद्ध खेळवल्या गेलेल्या विश्वचषक २०२३च्या सेमीफायनलमध्ये ७ विकेटनी भारताला विजय मिळवून दिला. या सामन्यात तो वनडे क्रिकेटमध्ये चौथ्यांदा पाच विकेट घेणारा गोलंदाज ठरला. याशिवाय त्याच्या नावावर आणखी एक रेकॉर्ड नोंदवला गेला आहे. तो विश्वचषकात ५० विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे.
तीन तीन वेळा केला होता आत्महत्येचा विचार
इथपर्यंत पोहोचण्याचा शमीचा प्रवास हा काही सोपा नव्हता. गेल्या काही वर्षांपासून शमीवर भरपूर आरोप तसेच वाद होत आहेत. त्यामुळे शमीने एकदा नव्हे तर तीन वेळा आत्महत्येचा विचार केला होता. ही ती वेळ होती जेव्हा २०१५मध्ये तो दुखापतीतून सावरत होती. त्याचवेळेस त्याच्या खासगी आयुष्यातही खूप उलथापालथ झाली होती. मात्र नशीबात काही वेगळेच लिहिले होते. कुटुंबाची साथ लाभली आणि आपल्या कठीण काळाशी लढून ते या मुक्कामापर्यंत पोहोचले.
कुटुंबाची साथ नसती तर काही भयानक झाले असते
त्याने सांगितले, माझे कुटुंब माझ्यासोबत होते आणि यापेक्षा मोठी ताकद कोणती असू शकत नाही. ते मला सांगत होते की प्रत्येक समस्येवर तोडगा असतो आणि मी केवळ खेळावर लक्ष द्यावे. ज्या गोष्टीत तु चांगला आहेस त्यात वेळ घालव.मला नव्हते माहीत की मी काय करत होते. मी दबावात होतो. सरावाच्या वेळेस मी दुखी होत होतो. माझे कुटुंबीय मला सांगत होते की फोकस कर. माझा भाऊ माझ्यासोबत होता. काही मित्र माझ्यासोबत होते.