Saturday, October 5, 2024
Homeताज्या घडामोडीBharat Sankalp Yatra : विकसित भारत संकल्प यात्रेतून विविध योजनांचा जागर!

Bharat Sankalp Yatra : विकसित भारत संकल्प यात्रेतून विविध योजनांचा जागर!

नाशिकमध्ये लाभार्थ्यांना करण्यात आले विविध योजनांचे वाटप

नाशिक : आदिवासी समाजातील वीरांनी देशासाठी दिलेले बलिदान व त्यागाची आपल्याला कायम प्रेरणा मिळत रहावी यासाठी जनजातीय गौरव दिन गेल्या तीन वर्षापासून साजरा करण्याचे आवाहन देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी करीत आहेत. जनजातीय गौरव दिनाचे औचित्य साधून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून विकसित भारत संकल्प यात्रा (Bharat Sankalp Yatra) मोहिमेचा शुभारंभ देशभरातून झाला आहे. या यात्रेचा रथ गावोगावी जावून विकासाच्या विविध शासकीय योजनांचा जागर होणार आहे असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी केले. आज दिंडोरी तालुक्यातील ननाशी ग्रामपंचायत येथे आयोजित विकसित भारत संकल्प यात्रा शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या.

यावेळी कार्यक्रमास राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जून गुंडे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी जितिन रहेमान, माजी आमदार धनराज महाले, एन.डी.गावित, जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी विवेक सोनवणे, उपजिल्हाधिकारी भिमराज दराडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) वर्षा फडोळ, ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प अधिकारी प्रतिभा संगमनेरे, लीड बँक मॅनेजर आर.आर.पाटील, महाराष्ट्र बँकेचे जनरल मॅनेजर दिनेश तांबट, तहसिलदार पंकज पवार, गट विकास अधिकारी दिंडोरी नम्रता जगताप आदि उपस्थित होते.

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार म्हणाल्या, कृषी विभाग, आरोग्य विभाग, महसूल विभाग व इतर विभाग यांच्या माध्यमातून शेतकरी, महिला, युवा यांच्यासाठी असणाऱ्या योजना गावागावात पोहचण्यासाठी हा विकास यात्रा रथ गावोगावी फिरणार आहे. या विकास रथाच्या माध्यमातून गावागावांतील नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती होणार असून वेगवेगळ्या योजनांच्या लाभासाठीचे फॉर्मस् सुद्धा यावेळी भरून घेतले जाणार आहेत. त्याचप्रमाणे लाभार्थ्यांचे के.वाय.सी संदर्भातील तसेच योजनांच्या बाबतीतील अडचणी व शंका यांचे निरसन सुद्धा जागेवर केले जाणार असल्याचे केद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी यावेळी सांगितले. प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून 5 लाखांचा आरोग्य विमा लाभार्थ्यांना मिळत आहे. उज्वला योजनेच्या माध्यमाजून 9 करोड पेक्षा जास्त गॅस कनेक्शन्स महिलांना उपलब्ध करून मिळाले आहे. शेतकरी सन्मान योजनेचा लाभही शेतकऱ्यांपर्यंत पोहचलेला आहे. यासारख्या अनेक योजनांची माहिती ही विकास यात्रा रथाच्या माध्यमातून देशभरातील गावागावात पोहचणार आहे. यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री डॉ. अजून मुंडा, केंद्रीय स्वास्थ व परिवार कल्याण मंत्री मुनसुख मांडविया, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी यावेळी मानले.

‘विकसित भारत संकल्प यात्रा’ कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व यंत्रणांनी शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी : पालकमंत्री दादाजी भुसे

विकसित भारत संकल्प यात्रा’ मोहिमेचा आज शुभारंभ आज झाला असून या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व यंत्रणांनी शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी योवळी केले.

पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेला आजपासून ते भारतीय प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 2024 पर्यंत ‘हमारा संकल्प, हमारा भारत’ हा कार्यक्रम देशभरात राबविला जाणार आहे. आदिवासी बांधवांसाठी ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्यांची नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, या योजना लोकांपर्यत पोहचाव्यात हाच या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. यासाठी राज्यात निवडलेल्या जिल्ह्यात नाशिकची निवड केल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार पालकमंत्री दादाजी भुसे यांनी मानले. ग्रामपातळीवरील विविध विभाग आपल्या वेगवेगळ्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहचविण्यात नक्कीच यशस्वी होतील असा विश्वास व्यक्त करीत पालकमंत्री दादाजी भुसे यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित व जनजातीय गौरव दिनाच्या उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.

विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून होणाऱ्या शासकीय योजनांचा लाभ आदिवासी बांधवांनी, शेतकरी, महिला व युवापिढीने घ्यावा व इतर बांधवांपर्यंतही योजनांची माहिती पोहचवावी. त्याचप्रमाणे शासकीय योजनांच्या माध्यमातून मिळाणाऱ्या सोय-सुविधांचे संवर्धन करणेही आपले आद्य कर्तव्य आहे अशा शब्दात विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमापूर्वी आदिवासी बांधवांनी नृत्य सादर केली यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ व केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनीही उर्स्फूतपणे नृत्यात सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी मान्यवर व उपस्थित नागरिकांनी विकसित भारत संकल्प सामुहिक शपथ घेतली. कार्यक्रमानंतर विकसित भारत संकल्प यात्रा रथास मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून यात्रेस प्रारंभ करण्यात आला.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सचिन पवार यांनी केले. यावेळी विविध शासकीय योजनांच्या लाभाचे प्रातिनिधीक स्वरूपात लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले.

आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड वितरण

लाभार्थी- श्रीमती सरला वाघ, मिराबाई चव्हाण, विजया शिंगाडे, जयश्री जाधव, रोशन सुभाष शिंगाडे

आभा कार्ड वितरण

लाभार्थी- शसंजय कुलकणी, मुरलीधर कहाणे,रामनाथ काकडे, विलास मांडेकर, श्रीमती जिजा धुळे

कृषी विभागामार्फत नॅनो युरिया बॉटल वितरण

लाभार्थी- रमाकांत शार्दूल, शांताबाई दिसोडे

एकात्मिक फलोत्पादन योजनेंतर्गत पूर्व संमती

लाभार्थी- केशव जोपडे, मोहन दादा चौधरी, पुंडलिक चोघरी

बँक ऑफ महाराष्ट्र तर्फे देण्यात आलेले लाभ

संगिता रामदास काकडे – 1लाख 25 हजार,

विमल ढगे -1 लाख 20 हजार

किसान क्रेडिट कार्ड

ताराबाई पगारे -1 लाख

प्रकाश आव्हाड- 2 लाख

कानिफनाथ मोरे- 1.6 लाख

इंडिया पोस्टे पेमेंट (पीएम किसान लाभा खात्यावर)

निंबा पाडवी, संजय हिंडे

एकात्मिक बालविकास योजनेंतर्गत पोषण आहार किट वाटप

हिराबाई शार्दूल (बाळआजी)

उज्वला योजना लाभ

मंगला सोमवंशी

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -