बिग बींना क्रिकेटप्रेमींची विनंती… बिग बींनी नेमकं केलं काय?
मुंबई : बॉलिवूडचे बादशहा अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचे जगभरात अनेक चाहते आहेत. वयाच्या ८१ व्या वर्षीदेखील ते फार उत्साहाने काम करतात. सध्याच्या काळासोबत ट्रेंडी राहण्याचा देखील त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. ते सोशल मीडियावरदेखील अॅक्टिव्ह (Social Media Active) असतात. मात्र, याच सोशल मीडियावरील त्यांच्या एका पोस्टमुळे क्रिकेटप्रेमींनी त्यांना थेट वर्ल्डकप फायनलचा सामना (ICC World Cup Final Match) न पाहण्याची विनंती केली आहे.
बिग बींचं क्रिकेटप्रेम तर सर्वश्रुतच आहे. काल पार पडलेल्या वर्ल्डकपच्या भारत विरुद्ध न्यूझीलंड (India Vs Newzealand) या उपांत्य फेरीतील भारताच्या विजयानंतर सगळीकडे जल्लोष करण्यात आला. बिग बींनीही यावर अगदी एका ओळीत ट्विट केलं. या ट्विटवर मात्र धडाधड बच्चनसरांनी फायनल सामना न पाहण्याची विनंती करणार्या कमेंट्स आल्या. असं काय होतं ते ट्विट ज्यामुळे चाहत्यांना ही विनंती करावी लागली?
काल भारत जिंकल्यानंतर भारतीयांचा आनंद ओसंडून वाहत होता. अमिताभ बच्चन यांनाही या गोष्टीचा खूप आनंद झाला आणि त्यांनी एक मजेशीर ट्विट केलं. त्यांनी लिहिलं की, जेव्हा मी सामना पाहत नाही तेव्हा आपण जिंकतो. त्यांच्या या ट्विटवर क्रिकेटप्रेमी म्हणाले, असं असेल तर तुम्ही फायनलचा सामनादेखील पाहू नका म्हणजे आपण नक्कीच जिंकू.
T 4831 – when i don’t watch we WIN !
— Amitabh Bachchan (@SrBachchan) November 15, 2023
एका क्रिकेटप्रेमीने तर चक्क एका अभिनेत्याचा डोळ्यांवर पट्टी बांधलेला लूक शेअर करत म्हटले, की वर्ल्डकप फायनलच्या दिवशी तुम्ही असे राहा. एका यूजरने लिहिले की, ‘सर फायनल मॅच पाहू नका.’ दुसऱ्याने लिहिले, ‘बच्चन सर, घरातच राहा.’ दुसर्या युजरने कमेंट केली की, ‘वर्ल्ड कप फायनलच्या दिवशी अमिताभ यांना एका दुर्गम बेटावर लॉक करण्याची काहीतरी व्यवस्था करूया.’ अशा प्रकारे युजर्सनी गंमतीशीर कमेंट करत अमिताभ यांना वर्ल्डकप फायनल न पाहण्याचा सल्ला दिला आहे.
Amitabh Bachchan sir, please be like this on Sunday. pic.twitter.com/A7hpPL0Tfa
— Zucker Doctor (@DoctorLFC) November 15, 2023