Monday, May 12, 2025

क्रीडाताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

World cup 2023: कोहली, श्रेयसचे शतक, न्यूझीलंडसमोर ३९८ धावांचे आव्हान

World cup 2023: कोहली, श्रेयसचे शतक, न्यूझीलंडसमोर ३९८ धावांचे आव्हान

मुंबई: विश्वचषक २०२३च्या(world cup 2023) सेमीफायनलमध्ये भारताने न्यूझीलंडसमोर विजयासाठी ३९८ धावांचे आव्हान ठेवले आहे. श्रेयस अय्यर, विराट कोहलीने ठोकलेल्या शतकांच्या जोरावर भारताने मुंबईच्या वानखेडे मैदानावर तब्बल ३९७ धावांचा डोंगर उभा केला.


भारताने टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहितचा हा निर्णय फलंदाजांनी योग्य सिद्ध केला. भारताचा कर्णधार रोहित शर्माने भारताला धमाकेदार सुरूवात करून दिली. रोहितने जबरदस्त फटकेबाजी करताना ४७ धावा केल्या.


रोहितसोबत फलंदाजी करणाऱ्या सलामीवीर शुभमन गिलने ८० धावांची खेळी करत संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात मदत केली. त्यानंतर आलेल्या विराट कोहलीने ११७ धावांची खेळी करत संघाला जबरदस्त धावसंख्या उभारून दिली.


चौथ्या क्रमांकावर खेळायला आलेल्या श्रेयस अय्यरनेही १०५ धावा ठोकल्या. लोकेश राहुल ३९ धावांवर नाबाद राहिला. वानखेडेच्या मैदानावर भारतीय क्रिकेटर्सकडून चौकार आणि षटकारांचा पाऊस पाहायला मिळाला. भारताने न्यूझीलंडविरुद्ध जबरदस्त खेळी करताना ३९७ धावा केल्या.

Comments
Add Comment