Saturday, May 10, 2025

महामुंबईमहाराष्ट्रराजकीयमहत्वाची बातमी

Nitesh Rane : संजय राऊतांच्या प्रतिज्ञापत्रात घोळ; त्यांचा वाढदिवस नक्की आज?

Nitesh Rane : संजय राऊतांच्या प्रतिज्ञापत्रात घोळ; त्यांचा वाढदिवस नक्की आज?

आमदार नितेश राणे यांनी केला नवा खुलासा


मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आज आपला वाढदिवस साजरा करत आहेत. मात्र त्यांचा वाढदिवस नेमका आजच आहे का, असा एक मोठा प्रश्न भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उपस्थित केला आहे. राज्यसभेच्या खासदारकीसाठी संजय राऊतांनी प्रतिज्ञापत्रात (Affidavit) केलेला घोळ नितेश राणे यांनी आज उघड केला. जन्मतारखेत बदल केल्याचं पितळ उघडं पाडत संजय राऊतांना नेमक्या शुभेच्छा कधी द्यायच्या असं विचारत नितेश राणे यांनी राऊतांना चांगलंच धारेवर धरलं आहे.


उबाठा सेनेमध्ये (Ubatha Group) उद्धव ठाकरेसकट (Uddhav Thackeray) सगळे सोंगाडे आणि ४२० भरले आहेत. एक तो चिपळूणचा सोंगाड्या आणि दुसरा भांडुपचा देवानंद. काही लोक जन्मजात सोंगाडे असतात. संजय राजाराम राऊतने हे सांगावं की २००४ ते २०१६ पर्यंत तुमच्या राज्यसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने तुमच्या प्रतिज्ञापत्रात तुमचा वाढदिवस हा १५ एप्रिल १९६१ चा आहे, आणि २०१६ ते २०१९ पर्यंत तुम्ही जे प्रतिज्ञापत्र भरलं त्यात तुमचा वाढदिवस १५ नोव्हेंबर १९६१ आहे.


मग जन्मतारीख नेमकी का बदलली? यामध्ये कुठली चारसौबीसी आहे? याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेला स्पष्टीकरण मिळालं पाहिजे. तुम्हाला शुभेच्छा नेमक्या आज द्यायच्या की १५ एप्रिलला याबद्दल जरा आजच्या दिवशी तरी महाराष्ट्राच्या जनतेच्या ज्ञानात भर टाका, असं नितेश राणे म्हणाले.






Comments
Add Comment