तब्बल १२ अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल
मुंबई : मुंबईतील भायखळ्यातील मदनपुरा येथे सैफी इमारचीला आग लागल्याची घटना समोर आली आहे. आज सकाळी आठ वाजताच्या सुमारास ही भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, या इमारतीतून सहा जणांची सुटका करण्यात आली. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती मिळालेली नाही. तसेच या आगीचे कारण देखील अद्याप अस्पष्ट आहे.