Monday, November 11, 2024
Homeक्रीडाRohit Sharma : भारताला पहिला धक्का; रोहित शर्मा अर्धशतकाआधीच मैदानाबाहेर

Rohit Sharma : भारताला पहिला धक्का; रोहित शर्मा अर्धशतकाआधीच मैदानाबाहेर

मुंबई : क्रिकेट विश्वचषकातील (Cricket World Cup) पहिली उपांत्य फेरी आज भारत आणि न्यूझीलंडदरम्यान (India Vs Newzealand) मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर (Wankhede Stadium) रंगली आहे. भारताने नाणेफेक जिंकत अर्धा डाव पक्का केला. कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत जोरदार फटकोबाजीला सुरुवात केली. त्याला तगड्या शुभमन गिलनेही (Shubhman Gill) उत्तम साथ दिली. मात्र, अर्धशतक पूर्ण व्हायच्या आतच रोहित शर्माने चाहत्यांची निराशा केली.

भारताचा कर्णधार रोहित शर्माने न्यूझीलंडविरोधात झंझावाती सुरुवात केली. मैदानावर त्याने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. मात्र, साऊदीच्या एका चेंडूवर षटकार मारण्याच्या नादात रोहित शर्मा बाद झाला. न्यूझीलंडच्या केन विल्यमसन याने जबरदस्त झेल घेतला. मात्र, रोहित शर्माने २९ चेंडूमध्ये ४७ धावांचे जबरदस्त योगदान दिले. यामध्ये चार चौकार आणि चार षटकारांचा समावेश आहे.

सध्या विराट कोहली (Virat Kohli) आणि शुभमन गिल नेहमीप्रमाणे मैदान गाजवत आहेत. त्यांच्या खेळीकडे अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिले आहे. आजच्या सामन्यातील विजय भारतासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे टीम इंडिया आज काय जादू करणार याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -