मुंबई: विश्वचषकमध्ये(world cup 2023) लीग स्टेजमध्ये सर्व सामने संपले आहेत. आता फायनल आणि सेमीफायनलचे सामने बाकी आहेत. या विश्वचषकात सेमीफायनलमध्ये भारत, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे संघ पोहोचले आहेत.
सेमीफायनलचा पहिला सामना १५ नोव्हेंबरला भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये रंगणार आहे. तर विश्वचषकातील दुसरा सामना दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १६ नोव्हेंबरला कोलकाताच्या ईडन गार्डन्समध्ये रंगणार आहे. या दोन सामन्यात जिंकणारा संघ फायनलला पोहोचणार आहे. त्यानंतर यांच्यातील विजेते संघ फायनलमध्ये भिडणार आहेत. १९ नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा अंतिम सामना रंगणार आहे.
रिझर्व्ह डे बाबत आयसीसीने केले कन्फर्म
अनेक क्रिकेट चाहत्यांच्या मनात असा प्रश्न आहे की जर सेमीफायनल आणि फायनल सामन्याच्या वेळेस पाऊस पडला तर काय होणार? याबाबतीत आयसीसीने कन्फर्म केले की दोन्ही सेमीफायनलचे सामने आणि फायनलचा सामन्यासाठी एक एक दिवसाचा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.
१५ नोव्हेंबरला भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणारा सेमीफायनलच्या सामन्यासाठी रिझर्व्ह डे १६ नोव्हेंबरला असेल. तर १६ नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या सेमीफायनल सामन्यासाठी १७ नोव्हेंबरला राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.
२०१९च्या विश्वचषकात भारताचा सेमीफायनचा सामना न्यूझीलंडविरुद्ध खेळवण्यात आला होता. त्या सामन्यात पावसाने व्यत्यय आणला होता. यानंतर सामना राखीव दिवशी पूर्ण करण्यात आला होता. यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. यावेळेस रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने लीग स्टेजमधील सर्व सामन्यात विजय मिळवला आहे. दुसरीकडे न्यूझीलंडने सुरूवातीला चांगले क्रिकेट खेळले होते. मात्र त्यानंतर सलग ४ सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला होता.