मुंबई: एकदिवसीय विश्वचषक २०२३मध्ये(world cup 2023) बुधवारी पहिला सेमीफायनलचा सामना १५ नोव्हेंबरला खेळवला जाणार आहे. यात भारत आणि न्यूझीलंड आमनेसामने असतील. वनडे क्रिकेटमध्ये हे ११८व्यांदा असणार आहे जेव्हा दोन संघ एकमेकांसमोर येतील. आतापर्यंत झालेल्या सामन्यांपैकी ५९ सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. तर ५० सामने न्यूझीलंडने जिंकले आहेत. दोघांमध्ये एक सामना बरोबरीत सुटला तर ७ मुकाबले अनिर्णीत ठरले.
सर्वोच्च धावसंख्या – टीम इंडियाने मार्च २००९मध्ये खेळवण्यात आलेल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध ४ बाद ३९२ हा स्कोर केला होता.
सर्वात कमी धावसंख्या – ऑक्टोबर २०१६मध्ये खेळवण्यात आलेल्या विशाखापट्टणम येथील वनडे सामन्यात भारताचा संघ अवघ्या ७९ धावांवर सर्वबाद झाला होता.
सगळ्यात मोठा विजय – न्यूझीलंडच्या संघाने भारतीय संघाला २०० धावांनी हरवले आहे. दाम्बुलामध्ये ऑगस्ट २०१०मध्ये झालेल्या सामन्यात टीम इंडियाला हा पराभव सहन करावा लागला.
सगळ्यात छोटा विजय – वेलिंग्टनमध्ये १९९०मध्ये भारताने न्यूझीलंडला एका धावेने हरवले होते.
सर्वाधिक धावा – भारत-न्यूझीलंड वनडे सामन्यात सचिन तेंडुलकरने १७५० धावा केल्यात..
सर्वाधिक शतक – माजी भारतीय क्रिकेट वीरेंद्र सेहवागने न्यूझीलंडविरुद्ध ६ वनडे शतक ठोकले आहेत.
सर्वाधिक विकेट – भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथने ५१ विकेट काढल्या होत्या.
सर्वाधिक कॅच – न्यूझीलंडचा दिग्गज फलंदाज रॉस टेलरने भारताविरुद्ध वनडे सामन्यात १९ कॅच घेतले आहेत.