मुंबई: भारताने विश्वचषक २०२३मधील(world cup 2023) ४५व्या सामन्यात नेदरलँड्सला(netherlands) १६० धावांनी हरवले. या दरम्यान, शुभमन गिलने शानदार फलंदाजी करताना अर्धशतक ठोकले. गिलने केवळ ३२ चेंडूत ५१ धावा केल्या. त्याने या अर्धशतकी खेळीदरम्यान एक रेकॉर्ड आपल्या नावे केला. गिल भारतासाठी एका कॅलेंडर ईयरमध्ये सर्वाधिक एकदिवसीय धावा करण्याच्या यादीत पाचव्या स्थानावर आला आहे. त्याने रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा रेकॉर्ड तोडला.
भारतासाठी एका कॅलेंडर ईयरमध्ये सर्वाधिक वनडे धावा करण्याचा रेकॉर्ड सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. त्याने १९९८मध्ये १८४९ धावा केल्या होत्या. सौरव गांगुली दुसऱ्या स्थानावर आहे. गांगुलीने १९९९मध्ये १७६७ धावा केल्या होत्या. राहुल द्रविडने १७६१ धावा केल्या होत्या. चौथ्या स्थानावर पुन्हा सचिन आहे. त्याने १९९६मध्ये १६११ धावा केल्या होत्या.
शुभमनने या वर्षी १५०० धावा केल्या आहेत. याबाबतीत त्याने रोहित आणि कोहलीला मागे टाकले आहे. रोहितने २०१९मध्ये १४९० धावा केल्या होत्या. कोहलीने २०१७मध्ये १४६० धावा केल्या होत्या.
भारताने नेदरलँड्सविरुद्ध पहिल्यांदा बॅटिंग करताना ५० षटकांत ४ बाद ४१० धावा केल्या होत्या. यादरम्यान गिलने ३ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ५१ धावा केल्या. रोहित शर्माने ५४ बॉलमध्ये ६१ धावा केल्या. त्याने ८ चौकार आणि २ षटकार लगावले. विराट कोहलीने ५ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ५१ धावा केल्या. केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांनी शतक ठोकले. राहुलने ६४ बॉलमध्ये १०२ धावा केल्या. अय्यरने ९४ बॉलमध्ये १२८ धावा केल्या.
भारताच्या आव्हानाचा पाठलाग करण्यास उतरलेला न्यूझीलंडचा संघ २५० धावांवर ऑलआऊट झाला. यासाठी टीम इंडियाकडून कोहली, शुभमन, रोहित शर्मा यांनी बॉलिंग केली. कोहलीने १३ धावांवर एक विकेट मिळवला. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन विकेट मिळवल्या.