Sunday, July 14, 2024
HomeदेशMumbai Pollution : प्रदूषणाची ऐसी की तैसी : कोर्टाचे निर्देश आणि पालिकेचे...

Mumbai Pollution : प्रदूषणाची ऐसी की तैसी : कोर्टाचे निर्देश आणि पालिकेचे नियम धाब्यावर…

हवेची गुणवत्ता पातळी भयंकर खालावली… पोहोचली ३०० जवळ

दिल्लीतही प्रदूषणाने गाठली धोकादायक पातळी

मुंबई : मुंबईत प्रदूषणाचे (Mumbai Pollution) प्रमाण प्रचंड वाढल्याने मुंबई महापालिकेने (BMC) दिवाळीदरम्यान (Diwali) नागरिकांसाठी काही नियमांची आखणी करुन दिली होती. दिवाळीत फोडण्यात येणार्‍या फटाक्यांमुळे (Crackers) तर अनेकांना श्वसनाचे विकार उद्भवतात. मात्र, या गोष्टींची जाण असूनही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुंबईकरांनी प्रदूषण नियंत्रणाचे नियम चांगलेच धाब्यावर बसवल्याचे दिसून आले. यामुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता पातळी (Air Quality Index) २८८ वर पोहोचली, जी अतिशय गंभीर आहे.

मुंबईकरांसाठी रात्री ८ ते १० या वेळेत फटाके फोडण्याची परवानगी देण्यात आली होती. फक्त पालिकेचेनेच नव्हे तर दोन तासच फटाके फोडावे असे स्पष्ट निर्देश कोर्टाने दिले होते. मात्र संध्याकाळी लवकरच फटाके फोडण्यास सुरुवात झाली. शिवाय सकाळच्या वेळेत आणि मध्यरात्रीही हे फटाके फोडणे सुरुच होते. माहितीनुसार, तब्बल १५० कोटींचे फटाके केवळ मुंबईतच फोडले गेल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मुंबईकरांना वाढत चाललेल्या प्रदूषणाची जाण कधी येणार हा एक मोठा प्रश्नच आहे.

गेल्या काही दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता काहीशी नियंत्रणात होती. मुंबईतील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळत असल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाकडून बांधकामे स्थगित करण्यासाठीचे निर्देश देण्यात आले होते. त्यामुळे दिवाळीआधी मुंबईच्या हवेची पातळी काहीशी सुधारली होती. पण, आता दिवाळीमध्ये हवेची पातळी पुन्हा घसरली आहे आणि याला मुंबईकर देखील जबाबदार आहेत.

दिल्लीतही प्रदूषणाने गाठली धोकादायक पातळी

दिल्लीत (Delhi Pollution) दिवाळीनंतर हवेची गुणवत्ता पातळी (AQI) पुन्हा एकदा वाईट श्रेणीत पोहोचली आहे. पाटणा, बिहारमध्ये तर ती अत्यंत वाईट श्रेणीत म्हणजे ३७० वर पोहोचली आहे. सोमवारी पहाटे दिल्ली-एनसीआरमध्ये धुराचे लोट दिसून आले. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसानंतर प्रदूषणाच्या पातळीत सुधारणा झाली होती, त्यानंतर पुन्हा एकदा दिल्लीची हवा पुन्हा खराब झाली आहे. सोमवारी सकाळपर्यंत दिल्लीतील पातळी ५१४ वर होती, ही अत्यंत गंभीर श्रेणी आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -