Friday, January 16, 2026

Maharashtra Weather: राज्यात कसे असणार हवामान, पावसाबाबत IMD दिले हे अपडेट

Maharashtra Weather: राज्यात कसे असणार हवामान, पावसाबाबत IMD दिले हे अपडेट

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यात काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळत आहे. हवामान विभागाने पुढील २४ तासांत राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. देशासह अनेक राज्यांमध्ये पावसाचे चित्र पाहायला मिळत आहे,

अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने राज्यात पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे आणि देशाच्या विविध भागात गडगडाटासह पावसाची स्थिती आहे. भारतीय हवामान विभागाने देशातील विविध ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्यात थंडी पडण्यास सुरू झाली असून नोव्हेंबरच्या शेवटी थंडीचा जोर वाढेल.

अनेक ठिकाणी पावसाची शक्यता

राज्यात काही दिवसांपासून बऱ्याच भागांमध्ये पाऊस बरसत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील २४ तासांत राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाची शक्यता आहे.

हवामान विभागाने आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवली आहे. रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पावसाच्या सरी कोसळू शकतात. यातच मुंबई, पुणे, सातारा आणि कोकण किनारपट्टीवरील परिसरात काही ठिकाणी रविवारी थोडासा पाऊस झाला तर काही ठिकाणी पावसाचे ढग आले होते. दरम्यान, दुपारी या ठिकाणी ऊन पडले होते.

पावसाने वाढवली थंडी

भारतीय हवामान विभागानुसार देशातील काही भागांमध्ये पाऊस तसेच वेगवान वाऱ्याची शक्यता आहे. पश्चिम हिमालय क्षेत्रात हिमवर्षाव झाला. देशातील अनेक राज्यांमध्ये थंडीचा प्रकोप वाढायला लागला आहे. दिल्लीतही तापमान घट पाहायला मिळाली तसेच थंडीही वाढू लागली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >