Wednesday, October 9, 2024
Homeताज्या घडामोडीDiwali gifts : दिवाळीचं गिफ्ट अजून नाही ठरलं? हे घ्या भावा बहिणींसाठी...

Diwali gifts : दिवाळीचं गिफ्ट अजून नाही ठरलं? हे घ्या भावा बहिणींसाठी स्वस्त आणि मस्त गिफ्ट्स…

मुंबई : राज्यभरात दिवाळी (Diwali Festival) उत्साहात आणि जोमाने साजरी केली जात आहे. मात्र, काहीजणांना सुटी न मिळाल्याने किंवा घाईगडबडीमुळे उद्यावर येऊन ठेपलेल्या भाऊबीजेसाठी (Bhaubeej) अजूनही भेट घेता आलेली नाही. त्यामुळे आता घाईघाईत काय बरं घ्यायचं? असा प्रश्न नक्कीच पडला असेल. त्यांच्यासाठी खास स्वस्त आणि मस्त गिफ्टचे ऑप्शन्स बाजारात उपलब्ध आहेत. यंदाच्या दिवाळीत तुम्ही हे गिफ्ट्स (Diwali gifts) आपल्या भावाबहिणींना नक्की घेऊ शकता.

१. बहिणीसाठी जयपुरी कुर्ता आणि झुमके (Jaipuri Kurta and Zumka) 

मुलींकडे कितीही कपडे असले तरी त्यांचं कपाट नेहमी नव्या कपड्यांच्या स्वागतासाठी तयारच असतं. अशावेळी बहिणीला नव्या स्टाईलचे कपडे तुम्ही विकत घेऊ शकता. दादर, ठाणे किंवा अनेक ठिकाणच्या बाजारांमध्ये सध्या उत्तम असे जयपुरी कॉटनचे कुर्ते उपलब्ध आहेत. शिवाय पारंपरिक लाँग कुर्तीही आकर्षक अशा डिझाईन्समध्ये उपलब्ध आहेत. हे सर्व कुर्ते केवळ २५०-३०० रुपयांपर्यंत तुम्ही विकत घेऊ शकता. त्यावर मॅचिंग असे छोटे किंवा मोठे शंभर रुपयांपर्यंतचे झुमके अथवा कानातले तुम्ही आपल्या बहिणीला भेट म्हणून दिले तर तिचा आनंद गगनात मावेनासा होईल.

२. साडी आणि पर्स (Saree and Purse)

बाजारामध्ये बनारसी सिल्क, मुनिया पैठणी, फॅब्रिक अथवा कॉटनच्या आकर्षक साड्या अगदी हजार ते पंधराशे या दरात उपलब्ध आहेत. शिवाय त्यावर मॅचिंग अशी पर्स २५० ते ३०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. दादर मार्केट यासाठी उत्तम पर्याय आहे. या ठिकाणी तुम्ही बहिणीसाठी छानशी साडी आणि त्यावर एक पर्स नक्कीच खरेदी करु शकता.

३. स्मार्टवॉच (Smartwatch)

सध्या मनगटी घड्याळांचा नव्याने ट्रेंड आला आहे. स्मार्टवॉचची सध्या जबरदस्त क्रेझ आहे. त्यामुळे आपण आपल्या भावासाठी छान घड्याळ खरेदी करू शकता. हा एक चांगला पर्याय आहे.

४. शर्ट किंवा टी-शर्ट (Shirt or T-shirts)

आपण आपल्या भावासाठी छान शर्ट किंवा टी-शर्ट खरेदी करू शकता. एक शर्ट आणि एक टी-शर्टची जोडी देखील तयार होऊ शकते. सदरा किंवा कुर्ता हाही एक उत्तम पर्याय आहे. ही सगळी खरेदी केवळ १००० रुपयांपर्यंत तुम्ही करु शकता. जर भाऊ धाकटा असेल तर त्याच्यासाठी ड्रेस खरेदी करू शकता.

५. इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स

जर भावाला इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सची आवड असेल तर तेही तुम्ही त्याला भेटवस्तू म्हणून देऊ शकता. पेन ड्राईव्ह, डेटा स्टोरेज डिस्क, मोबाइल स्टँड यासारख्या गोष्टींचा कॉम्बो भेट देऊ शकता. किंवा इअरफोन्स, हेडफोन्स, ब्लूटूथ स्पीकर यांसारख्या गोष्टीही भेट देता येऊ शकतात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -