Chandrakant Shewale : चंद्रकांत शेवाळे; दिवाळी अंकांचा ‘दिवा’ तेवत ठेवणारे व्यक्तिमत्त्व

Share

दिवाळीच्या फराळासोबत जर दिवाळी अंक नसेल, तर दिवाळी सुनी सुनी वाटते. दिवाळी आणि दिवाळी अंक ही मोठी परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. या परंपरेबाबत दैनिक प्रहार आयोजित गजाली कार्यक्रमात ग्रहांकित दिवाळी अंकाचे संपादक, प्रकाशक, दिवा संघटनेचे उपाध्यक्ष, रमल ज्योतिष गुरू आणि पुण्याच्या भालचंद्र ज्योतिविज्ञान स्वायत्त संस्थेचे कुलगुरू चंद्रकांत शेवाळे यांनी प्रहार टीमसोबत संवाद साधला. यावेळी दैनिक प्रहारचे महाव्यवस्थापक मनीष राणे, संपादक डॉ. सुकृत खांडेकर यांनी त्यांचे स्वागत केले.

तेजस वाघमारे

१९०९ साली का. र. मित्र नावाच्या कोकणी माणसाने पहिला दिवाळी अंक काढला. काशिनाथ रघुनाथ यांचे मित्र हे आडनाव नसून आपल्या बंगाली मित्राचे ‘मित्र’ हे आडनाव त्यांनी लावले होते. मित्र यांचा काशिनाथ रघुनाथ यांच्यावर प्रचंड प्रभाव पडला होता. यापूर्वी मित्र हे ‘मनोरंजन’ नावाचा अंक काढत होते. पाश्चिमात्य देशात ख्रिसमसला आणि महत्त्वाच्या सणांना विशेष अंक निघत असत. तसेच ग्रीटिंग निघत असत. बंगालमध्ये दुर्गा पूजेनिमित्त विशेष अंक काढले जायचे. त्याप्रमाणे दिवाळी सणानिमित्त ‘मनोरंजन’चा दिवाळी अंक काढण्याची सूचना मित्र यांनी केली. त्याप्रमाणे १९०९ साली ‘मनोरंजन’चा पहिला अंक आला. तिथून दिवाळी अंकांची परंपरा सुरू असून काही अंक ७५ वर्षांहून अधिक काळ सुरू आहेत. दिवाळी अंकांची शंभरी साजरी झाली असून आता त्याचा वाचक वर्ग खूपच कमी झाला असल्याने त्याच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे वास्तव चंद्रकांत शेवाळे यांनी मांडले. ते पुढे म्हणाले की, दिवाळी अंकांचा वाचक फार कमी झालेला आहे. त्याचे कारण म्हणजे इंग्रजी मीडियम. आपल्याकडे जसजसे इंग्रजी माध्यम सुरू झाले तसे दिवाळी अंकांचे महत्त्व कमी कमी होत गेले. कारण लोकांना मराठी साहित्य वाचनाची आवडच राहिली नाही. त्यातल्या त्यात व्हॉट्सअॅप, गुगल यांमुळे वाचक राहिलेच नाहीत. तरुण वर्ग तर वाचनापासून अगदी लांब गेलेला आहे. आवाज दिवाळी अंकाला दिवाळी अंकाचा बादशाह म्हटले जायचे. १९७१ ते १९८० हा दिवाळी अंकाचा सुवर्णकाळ मानला जातो. त्यावेळी आवाजचे ६५ हजार अंक निघत होते. या अंकाचे बाजारात येण्यापूर्वीच बुकिंग होत असे. वसुबारसेलाच तो अंक बाजारात येत होता. लोक रांगा लावून अंक खरेदी करत होते. त्यावेळी आवाजची जी क्रेझ होती ती आता खल्लास झाली. तशीच क्रेझ “ग्रहांकित” दिवाळी अंकाची होती. या अंकाच्या आम्ही नवीन आवृत्त्या काढून विकायचो. कारण असे की, भविष्य हा लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. आवाज, शतायुषी हे अंक आल्याशिवाय दिवाळीचा बाजार भरल्यासारखा वाटायचा नाही.

१९९८ साली दिवाळी अंकांचे वाचनालय सुरू केले. तेव्हा वाचनालयाचे ४०० सदस्य होते. दिवाळी अंक वाचण्यासाठी कुणी नसल्याने गेल्या दोन वर्षांपासून ती लायब्ररी बंद केली. अंक फुकट वाचण्यास दिला तरी लोक वाचत नसल्याचे वास्तव आहे. दिवाळी अंकांचे संच सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिले तरी त्याला वाचक मिळेनासा झाला आहे.

पण काही अंक लोक विकत घेतात, त्यांचा आजही खप आहे. अजून १०० टक्के दिवाळी अंक खल्लास झालेला नाही. १९९४ साली मी रंगत-संगत नावाचा ‘व्हीडिओ’ दिवाळी अंक काढला होता. त्यात कथा, कविता असे सर्व काही होते. पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही. दिवाळी अंकाचे संपादक ताकदीचे हवेत, तरच दिवाळी अंक वाचनीय ठरतात.

दिवाळी अंकाची सुरुवात होऊन ११४ वर्षे झाली आहेत. यापुढे दिवाळी अंक अजून किती वर्षे तग धरतात, हे पाहावे लागेल. आम्ही हयात असेपर्यंत आमचा अंक काढू. कागदाचे भाव इतके वाढले आहेत की, त्यामुळे अंकाच्या किमती वाढवाव्या लागत आहेत. वाचक अंकावरील किंमत पाहून अंक बाजूला ठेवू लागले आहेत. अस्तित्व टिकविण्यासाठी तोटा न होता हा व्यवसाय करावा लागत आहे. बहुतेक लोक अस्तित्वासाठी दिवाळी अंक काढत आहेत. व्यावसायिक स्तरावर ३००च्या वर अंक निघतात. तर सरकार दरबारी दीड हजार अंकांची नोंद आहे. दीड हजारांपेक्षा जास्त दिवाळी अंक निघतात. पण काही अंक स्थानिक पातळीपर्यंत मर्यादित असतात. ३०० पैकी २५ दिवाळी अंकांना तोटा होत नाही, बाकीचे सर्व अस्तित्व टिकविण्यासाठी धडपड करतात.

दिवाळी अंकाचा प्रचार, प्रसार करण्यासाठी १९९८ साली संपादक, प्रकाशकांची दिवा प्रतिष्ठान ही संघटना तयार झाली. याचे अध्यक्ष बी. वाय. पाध्ये पब्लिसिटीचे संचालक विजय ऊर्फ बाबा पाध्ये आहेत. उपाध्यक्ष ग्रहांकित मासिकाचे संपादक चंद्रकांत शेवाळे आणि कार्यवाह बालमैफल आणि साहित्य मैफल दिवाळी अंकाचे संपादक शिवाजी ह.धुरी आहेत. ही संघटना दरवर्षी वाचकांसाठी बक्षिसे, योजना जाहीर करते. याचा उपयोग दिवाळी अंकाच्या वाचन संस्कृतीसाठी होतो.

गेल्या दहा वर्षांचा दिवाळी अंकांचा ट्रेंड बघितल्यास उलट परिस्थिती झाली आहे. दिवाळी अंकांचा सेल कधी उठाव करतो, याचा अंदाज संपादकांना लावणे कठीण झाले आहे. म्हणून सुमारे ७० ते ८० दिवाळी अंकांनी दिवाळी अंकाच्या इतिहासात पहिल्यांदा दसऱ्यालाच दिवाळी अंक प्रकाशित केले आहेत. पाच हजारांहून अधिक अंक खपणाऱ्या दिवाळी अंकांची संख्या हाताच्या बोटावर मोजता येण्यासारखी आहे. आवाज, मेनका, माहेर, जत्रा, ग्रहांकित, दक्षता, धनंजय, चंद्रकांत हे प्रसिद्ध दिवाळी अंक आहेत. गेल्या २५ वर्षांत नव्याने आलेले विपुल स्त्री, मिळून साऱ्या जणी, उत्तम अनुवाद हे अंक त्यांची लोकप्रियता टिकवून आहेत. दिवाळी अंकांकडे वाचन संस्कृती म्हणून बघितले जाते. सर्व प्रतिथयश लेखकांची सुरुवात दिवाळी अंकापासूनच होते, हे एक सत्य आहे. ही लेखकांची परंपरा दिवाळी अंकांमुळेच आहे, असे म्हटल्यास ते वावगे होणार नाही. तरुणांना दिवाळी अंकांकडे आकर्षित करण्याची जबाबदारी संपादकांवर आहे. ही जबाबदारी संपादकांनी स्वीकारली पाहिजे.

काळाची पावले ओळखणारा संपादक

वैष्णवी भोगले

दैनिक ‘प्रहार’च्या गजालीचे यावेळी पंधरावे पुष्प असून ‘ग्रहांकित’ व ज्योतिष तंत्र-मंत्र या दिवाळी अंकांचे संपादक चंद्रकांत शेवाळे यांच्यासोबत गप्पा रंगल्या. चंद्रकांत शेवाळे हे दिवाळी अंकांच्या प्रकाशकांच्या “दिवा” या संघटनेचे उपाध्यक्ष आहेत. दिवाळी अंकांचे वाचक वाढवण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात. त्यांच्याशी रंगलेल्या गप्पांमध्ये ते म्हणाले की, दिवाळी अंक किंवा कोणत्याही विषयाचे वाचन आपल्या बुद्धीसाठी एक प्रकारचे खुराकच असते. त्यामुळे कोणताही आवडीचा विषय वाचला तरी आपल्या ज्ञानात भरच पडत असते. पण आताच्या डिजिटल युगात वाचन कमी होत आहे.
दिवाळी सणाच्या विविध पैलूंमध्ये महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात दिवाळी अंकांचे महत्त्वाचे स्थान आहे. दिवाळीच्या फराळासोबत दिवाळी अंक नसेल तर दिवाळीचा आनंद अपूर्णच राहातो, अशीच काहीशी भावना मराठी माणसाच्या मनावर ठसली आहे. म्हणूनच महाराष्ट्राच्या वाचन परंपरेवर दिवाळी अंकाचा वेगळाच प्रभाव दिसून येतो. दिवाळी अंक म्हणजे साहित्याचे उत्तम भांडार आणि शतकोत्तर चालत आलेली परंपरा आहे. मराठी वाचन संस्कृतीची जोपासना करणाऱ्या दिवाळी अंकांचा इतिहास आणि वाचक संस्कृती खूप मोठी असली तरी, मागच्या पिढीने आपल्या हाती दिलेला हा वारसा तेवढ्याच क्षमतेने पुढच्या पिढीच्या हाती सोपविण्यासाठी तो सर्वांनीच जपला पाहिजे. वर्षभरात जे काही चांगलं सुचलं असेल ते दिवाळी अंकासाठी राखून ठेवण्याची ही एक प्रथा आहे; परंतु कालौघात शैक्षणिक प्रगती, पर्यटनाचा विस्तार, आर्थिक सक्षमीकरण या सर्वांमधून वाचकांची जिज्ञासा वाढू लागली. दिवाळी अंकांमध्ये कथा, कविता, नाटक, दीर्घकथा यांच्यासोबत इतर भाषांमधील लेखकांच्या साहित्याला स्थान मिळू लागले. पुढे पुढे दिवाळी अंकांचे स्वरूप बदलत गेले. पर्यटन, राजकारण, ललित, समीक्षा, अर्थकारण, आंतरराष्ट्रीय संबंध असे स्वतंत्र दिवाळी अंक निघू लागले. त्यामुळे वर्षभरात गाजलेल्या वेगवेगळ्या विषयांवर लेखक लेखन साहित्य वाचकांपर्यंत पोहोचविले जाऊ लागल्याचे चंद्रकांत शेवाळे सांगतात.

परंतु गेल्या काही वर्षांत ऑनलाइन अपडेटमुळे तरुण वर्गाचे वाचनाकडील लक्ष कमी होऊ लागले आहे. सुरुवातीला वाचकांची विविध लेखांना मागणी असायची. पण आता जुना वाचक वर्गच अस्तित्वात नसल्यामुळे दिवाळी अंक कालबाह्य ठरत चालले आहेत. डिजिटल युगाने वाचन संस्कृतीची मोठी हानी होत आहे. गावापासून शहारापर्यंत अनेक दिवाळी अंक निघायचे. आता अंकांमधील दर्जेदारपणाची जागा जाहिरातींनी घेतली असल्याचे शेवाळे सांगतात. त्यामुळे काही प्रकाशन संस्थांनी, लेखकांनी मिळून काळाची पावले ओळखत कमी खर्चात डिजिटल दिवाळी अंक काढायला सुरुवात केली. अनेक दिवाळी अंकांची शंभरी पार पडली आहे. दिवाळी अंक ही मराठी माणसाची सांस्कृतिक गरज आहे. दिवाळी अंकांनी मराठी साहित्याला वेगळे वळण लावण्याची जबाबदारी कसोशीने पार पाडली आहे.

Recent Posts

Yavatmal Accident : यवतमाळ-नागपूर महामार्गावर भीषण अपघात! एकाच कुटुंबातील चार जण ठार

इनोव्हा कार ट्रकला धडकल्याने झाला अपघात  यवतमाळ : गेल्या काही दिवसांत अपघातांच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ…

4 mins ago

Ravindra Jadeja : रोहित-विराटनंतर रविंद्र जडेजानेही टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतली निवृत्ती!

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाने टी-२० विश्वचषकाचे (ITC T20 World cup) विजेतेपद पटकावल्याने देशवासीयांमध्ये आनंदाची…

17 hours ago

Lonavla news: भुशी डॅममागील धबधब्यात एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले!

पर्यटनासाठी आले आणि... पुणे : पावसाळा सुरु होताच अनेकजण पर्यटनाचं (Monsoon picnic) आयोजन करतात. मात्र,…

18 hours ago

Belapur News : बेलापूर गावात भाजपाचा विकास कामाचा पाहणी दौरा!

नवी मुंबई : महाराष्ट्र शासनामार्फत बेलापूर गावात होत असलेल्या विकास कामांचा पाहणी दौरा भाजपाच्या आमदार…

18 hours ago

New Rules : सामान्यांच्या खिशावर परिणाम होणार; जुलैपासून नियमावली बदलणार!

मुंबई : प्रत्येक महिन्याच्या १ तारखेपासून अनके गोष्टींच्या नियमांमध्ये (New Rules) बदल होतात. उद्यापासून म्हणजेच…

19 hours ago

Sujata Saunik : इतिहासात पहिल्यांदाच राज्याच्या मुख्य सचिवपदी महिला विराजमान!

सुजाता सौनिक यांची झाली नियुक्ती मुंबई : राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्याच्या मुख्य सचिवपदी (Chief Secretary…

19 hours ago