नवी दिल्ली: दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर सोमवारी झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात एका वयस्कर महिलेसह तीन जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. तर दोघांची प्रकृती गंभीर आहे. दिल्लीच्या वसंत विहार येथे राहणाऱे कुटंब दिल्ली येथून पुष्करला जात होते. या दरम्यान लक्ष्मणगढ ठाणे क्षेत्रात एक्सप्रेसवेवर ड्रायव्हरला डुलकी आल्याने गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडीने डिव्हायडरला धडक मारली.
दिल्ली-एक्सप्रेसवेवर झाला रस्ते अपघात
या घटनेबाबत एसएचओ श्रीरामन मीना यांनी सांगितले दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे पुलिया नंबर १०७वर चंद्रा का बासजवळ एक कार खाली कोसळली. घटनेची माहिती मिळताच लक्ष्मणगढ ठाणे पोलीस घटनास्थळी पोहोचली आणि जखमींना तातडीने रुग्णालयात नेले.
रस्ते अपघातात तिघांचा मृत्यू
दिल्लीत राहणारे निर्मला पाठक(वय ७० वर्षे), अरूण पाठक(४५ वर्षे) तसेच मुस्कान पाठक(वय २० वर्षे) यांचा मृत्यू झाला. तर गौतम पाठक(१६ वर्षे) आणि हर्ष पाठक(२० वर्षे) यांची स्थिती गंभीर झाली आहे. यानंतर त्यांना राजीव गांधी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ट्रामा सेंटरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दिल्लीवरून पुष्करला जात होते कुटुंबीय
मिळालेल्या माहितीनुसार हे कुटुंब सकाळी दिल्ली येथून ७ वाजता पुष्करला जात होते. गाडी अरूण पाठक नावाची व्यक्ती चालवत होती. यावेळी झोपेची डुलकी आली. यामुळे कारवरील ताबा सुटला आणि गाडी भिंत तोडून खाली पडली.