नवी दिल्ली: देशभरात आज दिवाळीचा जल्लोष पाहायला मिळत आहे. देशातील सर्व नागरिक दिवाळीचा जल्लोष साजरा करत आहेत. जिथे सामान्य नागरिक दिवाळीचा सण साजरा करत आहेत तेव्हा देशातील सर्वोच्च पदांवरील राजकीय नेतेही दिवाळीचा सण साजरा करत आहेत. तसेच एकमेकांची भेट घेत आहेत. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनीही उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदीसह केंद्रीय मंत्र्यांना राष्ट्रपती भवनात बोलवून त्यांची भेट घेतली तसेच त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
दिवाळीनिमित्त उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि त्यांची पत्नी डॉ. सुधेश जनखड राष्ट्रपती मुर्मू यांच्या निमंत्रणानंतर राष्ट्रपती भवनात पोहोचल्या. उपराष्ट्रपती धनखड यांनी राष्ट्रपती मुर्मू यांना गुलाबाचा गुच्छ देत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. पंतप्रधानही दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी राष्ट्रपती भवनात पोहोचले. त्यांनी राष्ट्रपती मुर्मू आणि उपराष्ट्रपती धनखड यांची भेट घेत त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
पियुष गोयल आणि स्मृती इराणी यांनीही घेतली राष्ट्रपतींची भेट
केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि महिला तसेच बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनीही दिवाळीनिमित्त राष्ट्रपती मुर्मू यांनी शुभेच्छा दिल्या. त्यांनी राष्ट्रपतींना फुलांचा गुच्छ भेट देत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. याआधी राष्ट्रपती मुर्मू यांनी देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
जवानांसह पंतप्रधान मोदींची दिवाळी
दिवाळीनिमित्त पंतप्रधान मोदी सकाळी सकाळीच हिमाचल प्रदेशातील लेप्चा येथे पोहोचले. यावेळी त्यांनी जवानांसोबत दिवाळी साजरी केली तसेच त्यांना आपल्या हाताने मिठाई खाऊ घातली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जेव्हापासून सत्ता हाती घेतली आहे तेव्हापासून दरवर्षी ते दिवाळीचा सण जवानांसोबत साजरा करत आहेत.