Wednesday, January 21, 2026

Diwali: ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

Diwali: ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

नवी दिल्ली: ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक(rishi sunak) यांनी जगभरात राहणाऱ्या हिंदू तसेच शीख बांधवांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. बुधवारी त्यांनी आपल्या पत्नीसह दिवा लावून शुभेच्या दिल्या होत्या. शनिवारी १० डाऊनिंग स्ट्रीट येथून दिलेल्या आपल्या भाषणात त्यांनी भारताच्या वारसाची आठवण काढली. ते म्हणाले, संपूर्ण ब्रिटन आणि जगभरातील हिंदू आणि शीख बांधवांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.

सुनक म्हणाले, हा एक असा क्षण आहे जेव्हा आपण दिव्यांच्या रोषणाईने संपूर्ण आसमंत उजळून टाकतो. पंतप्रधान म्हणून मी प्रतिबद्ध आहे की मी ही परिस्थिती चांगली करेन. दिवाळी हा सण अंधारावर प्रकाशाचा विजयाचे प्रतीक आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रपतींनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

याशिवाय दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती सीरिल रामाफोसाने दिवाळीच्या देशाच्या नागरिकांच्या संदेश दिला आहे. व्हिडिओ पोस्टच्या माध्यमातून ते म्हणाले, दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे. आम्ही विविधतेने आणि अनेक मान्यता असलेला भारत देश आहे. याच कारणामुळे आम्ही दिवाळीचे महत्त्व समजतो. दक्षिण आफ्रिकेत राहणाऱ्या सर्व हिंदुंना दिवाळीच्या शुभेच्छा. संपूर्ण देशात हा सण साजरा करतो.

Comments
Add Comment