Tuesday, October 8, 2024
Homeताज्या घडामोडीJumbo Covid Center Scam: जम्बो कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी सुजित पाटकरसह ४...

Jumbo Covid Center Scam: जम्बो कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी सुजित पाटकरसह ४ जणांविरोधात आरोपपत्र दाखल!

मुंबई : जम्बो कोविड सेंटर घोटाळा (Jumbo Covid Center Scam) प्रकरणी सुजित पाटकरसह चार जणांविरोधात मुंबई पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. यात कंत्राट मिळवण्यामध्ये अनियमितता असल्याचा आरोप करण्यात आला असून भागिदारी करार खोटा असल्याचा उल्लेख आरोपपत्रात करण्यात आला आहे. तसेच सरकारी तिजोरीचे १५ कोटी ३१ लाखांचे नुकसान झाल्याचे देखील म्हटले आहे.

यापूर्वी सुद्धा दोन आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. परंतु आता सविस्तर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

सुजित पाटकर यांनी डाक्टरांच्या सहाय्याने कोविट सेंटरच्या माध्यमातून पालिकेला कोट्यवधींचा गंडा घातला आहे. कोणताही अनुभव नसताना आपण अनुभवात पात्र आहोत, असे दाखवण्यात आले. तसेच डॉक्टर तसेच सपोर्ट स्टाफच्या खोट्या सह्या, खोटी कागदपत्रे, बनावट कागदपत्रे दिल्याचा आरोपपत्रात उल्लेख करण्यात आला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -